क्रीडा

अष्टपैलू खेळाडू दीपक चहरला फीट होण्यासाठी पाच आठवडे लागणार

चहर सध्या बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार घेत आहे

वृत्तसंस्था

भारताचा टी-२० स्पेशालिस्ट अष्टपैलू खेळाडू दीपक चहरला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी चार ते पाच आठवडे लागणार आहेत. दुखापतीमुळे संपूर्ण इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामातून बाहेर पडला होता. चहर सध्या बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर उपचार घेत आहे.

दीपक चहरचे वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेने टीम इंडियाच्या संघात पुनरागमन होते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेदरम्यान चहरला दुखापत झाली होती. चहर म्हणाला की, दुखापतीवरील उपचार व्यवस्थित सुरू आहेत. सध्या त्याला सलग चार ते पाच षटके गोलंदाजी करता येत आहे. सामन्याला लागणारा फिटनेस मिळविण्यासाठी मला आणखी चार ते पाच आठवडे लागू शकतील. चहरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेपर्यत तंदुरुस्त होण्याचे संकेत दिले. बरा झाल्यानंतरही मला क्लब स्तरावरील क्रिकेट खेळावे लागणार आहे, असे त्याने सांगितले. २९ वर्षीय चहर, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून बरे होत आहेत. या खेळाडूंवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे उपचार सुरू आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत