क्रीडा

भारतीय संघातील आणखी एक महिला खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला टी-२० सामना २९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाबरोबर होणार असतानाच संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय संघातील दुसरी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ दोन खेळाडूंविनाच बर्मिंगहमला रवाना झाला.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, ‘भारतीय संघातील दुसरी खेळाडूदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू हे भारतातच थांबले आहेत.

दरम्यान, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘नियमानुसार हे दोन्ही खेळाडू भारतीय संघात कोरोना निगेटिव्ह आल्यानंतरच सामील होऊ शकतात.’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी यापूर्वीच भारतीय महिला संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितले होते. महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे.

कोरोनाग्रस्त दोन खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील दुसरा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ३१ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर ३ ऑगस्टला साखळी फेरीतील शेवटचा सामना बार्बाडोस सोबत होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील महिला टी-२० क्रिकेटचे सर्व सामने हे एजबस्टन येथे होणार आहेत. महिला क्रिकेटच्या सेमी फायनल आणि फायनलची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहे.

भारतीय संघ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी संघाची कर्णधार हरमनप्रीतने सांगितले की, ‘खेळाडूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धा महत्त्वाची आहे, असा अनुभव फार कमी जणांना मिळतो. त्यामुळे आम्ही या स्पर्धेसाठी उत्सुक आहोत. राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटनचा सोहळा आमच्यासाठी खास असणार आहे.

Pune Porsche crash: "पोलिसांवर दबाव आणला नाही, मी पहिल्यापासून ‘नाईट लाईफ’च्या विरोधात"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं स्पष्टीकरण

Maharashtra HSC 12th Result 2024: यंदाही मुलींचीच बाजी; कोकण विभाग अव्वल तर 'या' विभागाचा सर्वात कमी निकाल!

Mumbai: फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाची धडक, घाटकोपर परिसरात ३७ पक्ष्यांचा मृत्यू

Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

KKR vs SRH: पावसामुळे सामना रद्द झाल्यास 'हा' संघ थेट फायनलमध्ये; आज ठरणार अंतिम फेरीचा पहिला मानकरी