क्रीडा

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानचा विजयारंभ

अझमतुल्ला ओमरझाई (२१ चेंडूंत ५३ धावा) आणि सेदिउल्ला अटल (५२ चेंडूंत नाबाद ७३ धावा) यांनी मंगळवारी तुफानी फटकेबाजी केली. त्यामुळे अफगाणिस्तानने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी नोंदवताना हाँगकाँगचा ९४ धावांनी धुव्वा उडवला.

Swapnil S

अबूधाबी : अझमतुल्ला ओमरझाई (२१ चेंडूंत ५३ धावा) आणि सेदिउल्ला अटल (५२ चेंडूंत नाबाद ७३ धावा) यांनी मंगळवारी तुफानी फटकेबाजी केली. त्यामुळे अफगाणिस्तानने आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी नोंदवताना हाँगकाँगचा ९४ धावांनी धुव्वा उडवला.

अबूधाबी येथील झैद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने २० षटकांत ६ बाद १८८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा दुबळा संघ २० षटकांत ९ बाद ९४ धावांपर्यंतच पोहचू शकला. गुलबदीन नैब व फझलहक फारुकी यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

आशिया चषकातील आजवरचे वेगवान अर्धशतक झळकावण्यासह (२० चेंडूंत) गोलंदाजीत १ बळी मिळवणाऱ्या ओमरझाईला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने ५ षटकार व २ चौकार लगावले. तर अटलने ६ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतकी खेळी साकारली. या विजयासह अफगाणिस्तानने ब-गटात २ गुणांसह अग्रस्थान मिळवले. त्यांची आता १६ तारखेला बांगलादेशशी गाठ पडेल, हाँगकाँगचा संघ गुरुवारी बांगलादेशशी खेळेल.

दरम्यान, आशिया चषकाच्या १७व्या पर्वाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ सुपर-फोर फेरी गाठतील. मग सुपर-फोर फेरीत प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीत खेळतील.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती