Photo : X (SonyLIV)
क्रीडा

Asia Cup 2025 : बांगला टायगर्सची आज हाँगकाँगशी लढत

लिटन दासच्या नेतृत्वाखाली खेळणारा बांगलादेशचा संघ गुरुवारी त्यांच्या आशिया चषकातील अभियानाला प्रारंभ करणार आहे. अबूधाबी येथील ब-गटातील लढतीत बांगलादेशसमोर हाँगकाँगचे आव्हान असेल.

Swapnil S

अबूधाबी : लिटन दासच्या नेतृत्वाखाली खेळणारा बांगलादेशचा संघ गुरुवारी त्यांच्या आशिया चषकातील अभियानाला प्रारंभ करणार आहे. अबूधाबी येथील ब-गटातील लढतीत बांगलादेशसमोर हाँगकाँगचे आव्हान असेल.

बांगलादेशने गेल्या तीन टी-२० मालिकांमध्ये अनुक्रमे श्रीलंका, पाकिस्तान व नेदरलँड्स यांना पराभूत केले आहे. त्यामुळे ब-गटातून आगेकूच करण्यासाठी त्यांना फेव्हरिट मानले जात आहे. यष्टिरक्षक लिटनसह अष्टपैलू मेहदी हसन, वेगवान गोलंदाज तस्किन अहमद व मुस्तफिझूर रहमान यांच्यावर बांगलादेशची भिस्त असेल.

दुसरीकडे हाँगकाँगला सलामीची लढत गमवावी लागल्याने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. कर्णधार झीशान अलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाची फलंदाजीत बाबर हयातवर भिस्त आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध संघाकडून सर्वाधिक ३९ धावा केल्या. दव येथे मोठ्या प्रमाणेत येत असल्याने नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो.

बांगलादेशने आजवर एकदाही आशिया चषक जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा ते लिटनच्या नेतृत्वात हा पराक्रम करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मात्र साखळी फेरीचा अडथळा ओलांडल्यानंतर त्यांना सुपर-फोर फेरीत भारत, पाकिस्तान यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वाटचाल सोपी नसेल.

प्रतिस्पर्धी संघ

  • बांगलादेश : लिटन दास (कर्णधार), तांझिद हसन, परवेझ होसेन, सैफ हसन, तौहिद हृदय, जेकर अली, शमीम होसेन, नुरुल हसन, मेहदी हसन, रिशाद होसेन, नसुम अहमद, मुस्तफिझूर रहमान, तांझिम हसन, तस्किन अहमद, शोरिफुल इस्लाम, मोहम्मद सैफुद्दीन.

  • हाँगकाँग : यासिम मोर्तझा (कर्णधार), झीशान अली, अंशुमन रथ, बाबर हयात, निजाकत खान, कल्हान चुल्लू, किंचीत शाह, ऐजाझ खान, एहसान खान, आयुष शुक्ला, अतीक इक्बाल, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएट्झे, गझनफर मोहम्मद.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती