Photo : X
क्रीडा

आशिया कप ९ ते २८ सप्टेंबरदरम्यान यूएईत; भारत-पाक लढत १४ आणि २१ सप्टेंबरला होण्याची शक्यता

पुरुषांची आशिया कप स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत युनायटेड अरब इमिरेट्समध्ये (यूएई) होणार असल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शनिवारी जाहीर केले.

Swapnil S

कराची/नवी दिल्ली : पुरुषांची आशिया कप स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत युनायटेड अरब इमिरेट्समध्ये (यूएई) होणार असल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शनिवारी जाहीर केले. वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गटातील लढत रविवार १४ सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात असून २१ सप्टेंबरला होणाऱ्या सुपर ४ लढतीत ते दुसऱ्यांदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भारतीय संघ स्पर्धेची सुरुवात १० सप्टेंबरला यूएईविरुद्धच्या लढतीने करणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईतच होण्याची शक्यता आहे.

अ गटात भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान हे संघ आहेत. ब गटात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने १९ सामन्यांच्या स्पर्धेकरिता प्रत्येक संघात १७ सद्यस्यांना परवानगी दिली आहे. स्पर्धेतील सामने हे दुबई आणि अबुधाबी येथे खेळवले जाणार आहेत.

अशा होणार लढती !

भारतीय संघ १० सप्टेंबरला यूएई विरुद्धच्या लढतीने स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात करणार आहे. १४ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेल सामना होईल. १९ सप्टेंबरला भारतासमोर ओमानचे आव्हान असेल. २० सप्टेंबरला बी१ आणि बीर यांच्यात लढत होईल. २१ सप्टेंबरला ए१ आणि ए२ यांच्यात सामना होईल. हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. २३ सप्टेंबरला ए२ विरुद्ध बी१, २४ सप्टेंबरला ए१ विरुद्ध बी२, २५ सप्टेंबरला ए२ विरुद्ध बी२, २६ सप्टेंबरला ए१ विरुद्ध बी१ आणि २८ सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

मोतीलाल नगर पुनर्विकासावर शिक्कामोर्तब; सर्वोच्च न्यायालयाचाही म्हाडाच्याच बाजूने निर्णय

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध; गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम पोस्ट न करण्याचे आदेश

जलाभिषेकासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कावडियांच्या बसची गॅस सिलेंडरच्या ट्रकला जोरदार धडक, १८ जणांचा मृत्यू

स्टारलिंक २० लाख कनेक्शन देऊ शकते; दूरसंचार राज्यमंत्र्यांची माहिती

पुण्यातील भूखंड हडप, खंडणी प्रकरणात पाच आरोपींना जामीन; उच्च न्यायालयाचा दिलासा