क्रीडा

Asian Boxing Championships 2022 : आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२मध्ये भारताच्या बॉक्सर्सची सुवर्ण कामगिरी

प्रतिनिधी

आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२मध्ये (Asian Boxing Championships 2022) भारतीय महिलांनी सुवर्ण चौकार मारत भारतीयांनाही मान उंचावली आहे. लवलिना बोरगोहेन (७५ किलो), परवीन हुडा (६३ किलो), स्विटी (८१ किलो) आणि अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा अधिक) यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर, मीनाक्षी (५२ किलो) एऊप्यपदक पटकावले आहे.

जॉर्डनमधील अम्मान येथे झालेल्या आशियाई एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिनाने आशियाई चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेती उझबेकिस्तानच्या रुझमेटोवा सोखिबावर वर्चस्व राखले आणि ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत ५-० असा विजय मिळवला. तर परवीन हुडाने जपानच्या किटो माईविरुद्ध ५-० असा विजय मिळवला.

वर्ल्ड चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती स्वीटीने कझाकिस्तानच्या गुलसाया येरझान ५-० ने मात केली. ८१ किलोपेक्षा अधिक वजनी गटात अल्फिया पठाणच्या विरुद्ध खेळणाऱ्या इस्लाम हुसैलीला पंचांनी अपात्र ठरवल्यानंतर महिला विभागात भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासात ही भारताची तिसरी सर्वोत्तम कामगिरी कामगिरी ठरली आहे. याआधी २००५मध्ये सात सुवर्णपदके तर २००३मध्ये पाच सुवर्णपदके नावावर केली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?

काय सांगता! Bajajनं आणली चक्क CNG BIKE, 'या' दिवशी होणार लॉन्च