क्रीडा

Asian Games 2026 : मिक्स मार्शल आर्ट्स; सुचिका तरियालला कांस्यपदक

भारताच्या सुचिका तरियाल हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पारंपरिक ६० किलो मिश्र मार्शल आर्ट्स (एमएमए) प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.

Swapnil S

नागोया : भारताच्या सुचिका तरियाल हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पारंपरिक ६० किलो मिश्र मार्शल आर्ट्स (एमएमए) प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.

सिंगापूरच्या हुई हून तेओविरुद्धचा अटीतटीचा उपांत्य सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सकाळी घेतलेल्या वजनात प्रतिस्पर्धी खेळाडू हलकी भरल्याने तिला विजेते घोषित करण्यात आले. त्यामुळे सुचिकाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आशियाई खेळांच्या २० व्या आवृत्तीत प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या एमएमए प्रकारातील भारताचे हे पहिलेच ऐतिहासिक पदक ठरले आहे. अंतिम निकाल जाहीर होताच ३६ वर्षीय सुचिकाला मॅटवरच अश्रू अनावर झाले.

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील किलोई गावची रहिवासी असलेली सुचिका २०२४ मधील जिउ-जित्सूची जागतिक विजेती आहे. तिने २०२२ च्या राष्ट्रकुल खेळात ज्युडो आणि २०२२ च्या आशियाई खेळात कुराश प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. “हा निकाल माझ्यावर अन्याय करणारा आहे. मी दोन्ही फेऱ्यांमध्ये तिला खाली पाडले होते. तरीही देशासाठी कांस्यपदक जिंकल्याचा मला अभिमान आहे,” अशी प्रतिक्रिया सुचिकाने दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन