ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : रेनशॉचे पहिले शतक; ऑस्ट्रेलियाचा विजयारंभ 
क्रीडा

ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : रेनशॉचे पहिले शतक; ऑस्ट्रेलियाचा विजयारंभ

मॅट रेनशॉचे (९४ चेंडूंत १०९ धावा) पहिले एकदिवसीय शतक आणि जलदगती गोलंदाज नॅथन एलिसचे ५ बळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा ५९ धावांनी पराभव केला.

Swapnil S

हरारे: मॅट रेनशॉचे (९४ चेंडूंत १०९ धावा) पहिले एकदिवसीय शतक आणि जलदगती गोलंदाज नॅथन एलिसचे ५ बळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा ५९ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ८ बाद २९४ धावांचा डोंगर उभारला. रेनशॉने ९४ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली, तर कुपर कॉनोलीने ५१ धावांचे योगदान दिले. १२ वर्षांनंतर झिम्बाब्वेच्या भूमीत पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरवात खराब झाली होती.

१०७धावांवर ४ गडी गमावल्यानंतर रेनशॉने कॅरीसोबत ७२ धावांची आणि ऑलिव्हर पीकसोबत (३० धावा) ७४ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ २३५ धावांवर आटोपला. एलिसने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना बाद केले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI वरील शुल्काचा भार व्यापाऱ्यांवर नको; दिल्लीतील व्यापाऱ्यांना धास्ती, पुन्हा रोखीकडे वळण्याचा निर्णय

१५ वर्षे पूर्ण झालेली मुस्लिम मुलगा-मुलगी लग्नासाठी सक्षम; पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय

शाहझाद भट्टी टोळी दहशतवादी संघटना घोषित; गृह मंत्रालयाकडून UAPA कायद्यांतर्गत बंदी, देशभरातून २०० जणांना अटक

तृतीयपंथीयांना घर नाकारले तर कारवाई; राज्य सरकारचा इशारा

Mumbai : दोन हजार कोटी खर्चुन हॉटेल, पार्किंग हब, शॉपिंग मॉल; मानखुर्द जकात नाक्यावर ३० मजली इमारत