क्रीडा

ऑस्ट्रेलियन ओपन; बोपण्णा-शुई उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा चीनी जोडीदार झँग शुई यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Swapnil S

मेलबर्न : भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा चीनी जोडीदार झँग शुई यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रविवारी होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात या जोडीला वॉकओव्हर मिळाला.

बोपण्णा-शुई जोडीचा सामना युनायटेड स्टेट्सचा टेलर टाऊनसेंड आणि मोनॅकोच्या ह्युगो न्यास यांच्याशी होणार होता. मात्र या सामन्यात वॉकओव्हर मिळाल्याने भारत-चीन जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

टिमिया बाबोस- मारसिलो ॲरेवालो आणि ऑस्ट्रेलियन जोडी ऑलिव्हीया गडेकी-जॉन पिर्स यांच्यात सामना होणार आहे. त्यांच्यातील विजेत्या जोडीशी बोपण्णा आणि शुई यांचा पुढचा सामना होणार आहे.

बोपण्णा-शुईने स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात फ्रान्स-क्रोएशियाच्या जोडीला ६-४, ६-४ असे पराभूत करत त्यांनी आगेकूच केली.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या