क्रीडा

इंग्लंड दौऱ्यासाठी मुंबईकर आयुष म्हात्रेकडे भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व; वैभव सूर्यवंशीचीही 'एंट्री'

मुंबईच्या १७ वर्षीय आयुष म्हात्रेकडे आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय युवा संघाचे (१९ वर्षांखालील) कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याशिवाय १४ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : मुंबईच्या १७ वर्षीय आयुष म्हात्रेकडे आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय युवा संघाचे (१९ वर्षांखालील) कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याशिवाय १४ वर्षीय डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

२४ जूनपासून भारत-इंग्लंड यांच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये विविध प्रकारांतील सामने रंगतील. यासाठी लवकरच भारताचा संघ इंग्लंडला रवाना होईल. प्रथम दोन्ही संघांत ५० षटकांचा एक सराव सामना होईल. त्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांची ‘युथ वनडे’ मालिका खेळवण्यात येईल. १२ जुलैपासून चार-चार दिवसांच्या प्रत्येकी दोन कसोटी लढतीही होतील. २३ जुलै रोजी हा दौरा समाप्त होईल. एकंदरच आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर आता आयुष आणि वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवरही छाप पाडण्यास तयार आहेत.

विरारच्या आयुषने आयपीएलमध्ये चेन्नईकडून यंदा पदार्पण केले. मुंबईविरुद्ध वानखेडेवर त्याने छोट्याश्या खेळीत लक्ष वेधले. मग बंगळुरूविरुद्ध आयुषने ९४ धावा फटकावल्या. दुसरीकडे बिहारच्या वैभवने पदार्पणातच हल्लाबोल केला. लखनऊविरुद्ध पहिल्याच आयपीएल चेंडूवर षटकार लगावल्यानंतर गुजरातविरुद्ध वैभवने तुफानी शतक झळकावले. तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा शतकवीरही ठरला.

भारताचा संघ

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंग छावडा, राहुल कुमार, अभिग्यान कुंडू, ह‌रवंश सिंग, आर. एस. ॲम्ब्रिश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, युधजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल