India vs England 5th Test 
क्रीडा

RCB च्या धडाकेबाज फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीसाठी झाली संघाची घोषणा

के एल राहुल दुखापतीमुळं पाचव्या कसोटीतही खेळणार नाहीय.

Naresh Shende

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून भारताने ३-१ ने आघाडी घेत या मालिकेत विजय संपादन केलं आहे. ७ मार्चला धर्मशाला येथे हा पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार असून या सामन्यासाठी बीसीसीआयने भारताचा संघ जाहीर केला आहे. के एल राहुल दुखापतीमुळं पाचव्या कसोटीतही खेळणार नाहीय. परंतु, आरसीबीचा डावखुरा आक्रमक फलंदाज देवदत्त पड्डीकलची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली असून त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, के एल राहुल धर्मशाला येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्या फिटनेसकडे लक्ष ठेवून आहे. तसंच राहुलच्या आरोग्यविषयत समस्यांवर उपचार करण्यासाठी लंडनमध्ये तज्ज्ञांसोबत चर्चाही सुरु आहे. जसप्रीत बुमराहचा पुनरागमन झालं असून तो पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. तर वॉशिंगटन सुंदरला संघातून रिलीज करण्यात आलं आहे.

मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुंदर तामिळनाडू संघाचं प्रतिनिधीत्व करणार आहे. हा सामना संपल्यानंतर आवश्यकता असल्यास सुंदर या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघासोबत जोडला जाईल. २६ फेब्रुवारी २०२४ ला शमीची सर्जरी यशस्वी झाली. शमीच्या फिटनेसमध्ये सुधारणा होत आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत तो लवकरच दाखल होणार आहे.

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), के एस भरत (विकेटकिपर), देवदत्त पड्डीकल, आर आश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मो. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी