क्रीडा

BCCI च्या निर्णयाने KKR ला धक्का; बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल संघातून बाहेर काढण्याचे निर्देश बीसीसीआयने शनिवारी (दि.३) दिले. “सध्या सर्वत्र सुरू असलेल्या घडामोडी...

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल संघातून बाहेर काढण्याचे निर्देश बीसीसीआयने शनिवारी (दि.३) दिले. “सध्या सर्वत्र सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिली.

बीसीसीआयने स्पष्ट केले की, "मुस्तफिजुरला रिलीज केल्यानंतर केकेआरला पर्यायी खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे संघाच्या समतोलावर परिणाम होणार नाही," असेही सैकिया यांनी नमूद केले.

"११ जानेवारीपासून भारत-न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांचा एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. आज आमची निवडकर्त्यांसोबत बैठक आहे आणि दुपारी आम्ही न्यूझीलंड मालिकेसाठी संघ जाहीर करणार आहोत," अशी माहिती सैकिया यांनी एएनआयशी बोलताना दिली.

सर्वात महागडा बांगलादेशी खेळाडू

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या आयपीएल मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजुर रहमान याला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा बांगलादेशी खेळाडू ठरला होता. मात्र, या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला.

शाहरुखवर टीकेची झोड

बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानला संघात घेण्याच्या निर्णयामुळे शाहरुखवर टीकेची झोड उठली होती. बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायांविरोधात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर मुस्तफिजुरच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. खेळ हा राजकारणापासून वेगळा ठेवावा, असा एक मतप्रवाह असतानाच, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आयपीएलसारख्या स्पर्धांवर परिणाम होऊ शकतो का, यावरही जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळेच बीसीसीआयने मुस्तफिजुर रहमानला आयपीएल संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले.

BMC Election : मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती

Zilla Parishad Election Maharashtra : आज जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा?

भाजपकडून अजितदादांची कोंडी; सावरकरांचे विचार मानावेच लागतील!

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने तोडले तारे; वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात संताप

अजब! भाजपने धरला काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; अंबरनाथमध्ये भाजपसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत, शिवसेना विरोधी बाकावर