नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंसह आयपीएलमधील समालोचकांना कडक इशारा दिला आहे. सातत्याने होणाऱ्या नियमभंगाला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने ठोस पावले उचलली आहेत.
स्पर्धेदरम्यान खेळाडू, सहाय्यक व संघ अधिकाऱ्यांच्या हॉटेल रूममध्ये अनधिकृत किंवा परवानगी नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच टीम रूम, काचेच्या अडथळ्यां व गंभीर धोके टाळण्यासाठी बीसीसीआयने काही निर्णय घेतले आहेत.
आयपीएलच्या काही लढतींमध्ये खेळाडूंच्या लगतच्या रूम्स, बायोबबल तसेच हॉटेलमध्ये काही परवानगी नसलेल्या व्यक्तींची रेलचेल दिसून आली आहे. त्यामुळे बीसीसीआयने सर्व संघमालकांना याविषयी पत्र पाठवले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी यासंदर्भात एक विशेष सूचना जारी केली आहे. आपण संघांकडे दुर्लक्ष केल्यास स्पर्धेवर संबंधित संघ आणि बोर्डाच्या प्रतिमेला मोठी हानी पोहोचू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
या गैरवर्तणुकीमुळे संबंधित खेळाडू आणि संघांवर अवांछित अडचणी तसेच सुरक्षा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. बीसीसीआयचे लॉजिस्टिक आणि प्रतिबंधक आणि सुरक्षा यंत्रणेने संपूर्ण वातावरणात अनधिकृत व्यक्तींच्या वावराबाबत काही आक्षेप नोंदवले होते. त्यानुसार लागच बोर्डाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयपीएल गर्व्हनिंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनीही यापूर्वी या अनियमिततेबाबत भाष्य केले होते. एकूणच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बीसीसीआय खबरदारी बाळगत आहे.
व्हेपिंगवर बंदी
राजस्थानचा कर्णधार पराग ड्रेसिंग रूममध्ये व्हेप ओढताना (ई-सिगारेट) आढळला होता. व्हेपिंग बंद करण्याबाबत बीसीसीआयने भरणाऱ्या कार्यशाळांदरम्यान ई-सिगारेट बंद असल्याचे सांगितले. तसेच प्रतिबंधित पदार्थांचा वापर करणारा तो खेळाडू कारवाईस सामोरा जाईल, असे सांगितले. पंजाब विरुद्धच्या बुधवारी दिल्लीतील सामन्यात ई-सिगारेट ओढताना तो दिसला होता. मात्र याबाबत अद्याप बीसीसीआयने कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाही.
उशिरा बाहेर जाण्यास मनाई
खेळाडू तसेच प्रशिक्षकीय भूमिकेत सदस्यांना रात्री उशिरा हॉटेलबाहेर जाण्यास मनाई आहे. तसे अलीकडे महत्त्वाचे आयपीएल खेळाडूंबाबत माहिती आयपीएलला देणे गरजेचे आहे. खेळाडू परवानगीशिवाय रात्री उशिरा हॉटेलबाहेर पडले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच परवानगीशिवाय अन्य अनधिकृत व्यक्ती हॉटेलमध्ये आल्यास त्यांनाही रोखले जाईल. काही दिवसांपूर्वी वायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये जोफ्रा आर्चर मध्यरात्री हॉटेलच्या बाहेर पडताना दिसला होता. तसेच त्याच्यासोबत अनोळखी व्यक्तीही आढळून आली होती.
संघमालकांना ताकीद
सामन्यादरम्यान खेळाडूंना भेटणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे आयपीएलच्या नियमावलीनुसार प्रतिबंधित आहे. सामने संपल्यानंतर मालकांना खेळाडू आणि संघ सदस्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. सामना सुरू असताना काही क्रिकेट संघमालकांनी खेळाडू, प्रशिक्षकांसह त्यांच्या पत्नींना भेटी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे बीसीसीआयने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. असे वर्तन किती सद्भावनेने केले असले, तरी त्यामुळे नियम उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे संघाच्या परिसरात आणि सामन्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.