क्रीडा

फटक्यांची निवड चुकली; रवी शास्त्री यांनी ठेवले भारताच्या चुकांवर बोट

बॉक्सिंग डे कसोटीच्या पाचव्या दिवशी मधल्या सत्रात खराब फटक्यांच्या निवडीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याचे भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले.

Swapnil S

सिडनी : बॉक्सिंग डे कसोटीच्या पाचव्या दिवशी मधल्या सत्रात खराब फटक्यांच्या निवडीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याचे भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले. या चुकीमुळे बॉर्डर- गावस्कर मालिकेवरील भारताला नियंत्रण सुटल्याचे शास्त्री म्हणाले.

शास्त्री यांनी कोणत्याही खेळाडूंची नावे घेणे टाळले. मात्र दोन वरिष्ठ खेळाडू आणि युवा खेळाडू यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचे जाणवले.

जगाच्या कानाकोपऱ्यातील भारतीय प्रेक्षक मोठा प्रवास करून कसोटी मालिकेचा आनंद घेत आहेत हे विलक्षण असल्याचे शास्त्री यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी मधल्या सत्रात भारताच्या फलंदाजांनी खराब फटक्यांची निवड केली. त्याचे परिणाम भारताला भोगावे लागले. त्यामुळे एक कसोटी शिल्लक असताना भारताने मालिकेवरील नियंत्रण गमावल्याचे शास्त्री म्हणाले.

ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि भारतीय कर्णधार यांच्यात त्यांनी तुलना देखील केली. कमिन्सने मालिकेत दर्जेदार कामगिरी केली आहे. तर रोहितने मात्र निराश केल्याचे शास्त्री म्हणाले.

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या कसोटीत केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना टिकेचे धनी व्हावे लागले. ही कसोटी ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेत बरोबरी राखण्यासाठी भारताला सिडनी येथील कसोटी जिंकणे अनिवार्य आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या