क्रीडा

CWC 2023 :पाकिस्तानसह 'हे' ५ संघ विश्वचषकातून जाऊ शकता बाहेर? जाणून घ्या....

भारताचा कट्टर विरोधी प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासाठी अतिशय वाईट बातमी येण्याची शक्यता आहे

नवशक्ती Web Desk

सध्या भारतात एकदिवसीय विश्वचषक 2023ची धामधूम चालू आहे, विश्वचषकातील सामन्यांकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे. कोणता गट पुढे जाईल आणि कोणता गट या सामन्यातून बाहेर पडेल यावर सर्वांचं लक्ष आहे. मात्र, येणाऱ्या 6 दिवसांत म्हणजेच 31 ऑक्टोबरपर्यंत उपांत्य फेरीचे चित्र जवळपास पूर्णपणे स्पष्ट होणार असल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना होणार आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित होणार आहे.

पण या उलट भारताचा कट्टर विरोधी प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासाठी अतिशय वाईट बातमी येण्याची शक्यता आहे. कारण 27 ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान जिकूं शकेल यांची शक्यता फारच कमी दिसत आहे. पाकिस्तान संघ जर हा सामना हरला तर विश्वचषकातील त्याचं पॅकअप जवळपास निश्चित होईल.

पाकिस्तानसह श्रीलंका, अफगाणिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश हे संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता जवळपास निश्चित दिसत आहे. नेदरलँड आणि बांगलादेशाने आतापर्यंत 5 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. तर, अफगाणिस्तानाने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. पण त्यांचा पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध आहे. यानंतर अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचाही सामना करावा लागणार आहे. ज्यात जिंकणे जवळपास खूप कठीण असणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी