चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांतचा सनसनाटी विजय; सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत (Photo-X)
क्रीडा

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांतचा सनसनाटी विजय; सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने चायना मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी मोठा धक्कादायक विजय नोंदवला.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने चायना मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारी मोठा धक्कादायक विजय नोंदवला. श्रीकांतने कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या व्हिक्टर लाई याचा सरळ गेममध्ये २१-१८, २१-१९ असा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

या वर्षी अमेरिकन ओपन सुपर ३०० स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावणाऱ्या ३३ वर्षीय श्रीकांतने गेल्या महिन्यात नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकणाऱ्या लाईविरुद्ध अप्रतिम पुनरागमन केले. सामन्यानंतर श्रीकांत म्हणाला की, “मी स्कोअरचा अजिबात विचार करत नव्हतो. सामन्यादरम्यान मी काय करत होतो आणि पुढे मला काय करायचे आहे, याचाच विचार माझ्या मनात सुरू होता. तो गेल्या १२-१४ महिन्यांपासून उत्तम खेळत आहे, पण प्रत्येक दिवस नवा असतो आणि मी माझा सर्वोत्तम खेळ केला तर जिंकण्याची संधी असेल, याच विचाराने मी मैदानावर उतरलो होतो.” जागतिक क्रमवारीत माजी अव्वल क्रमांकावर राहिलेला आणि २०२१ चा जागतिक उपविजेता श्रीकांत आता पुढील सामन्यात हाँगकाँगच्या ली चुक यूचा सामना करेल.

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने फ्रान्सच्या ख्रिस्टो आणि तोमा ज्युनियर पोपोव्ह या भावांच्या जोडीवर २१-१५, २२-२४, २१-९ अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिला गेम सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने दोन मॅच पॉईंट गमावले आणि पोपोव्ह भावांनी सामना निर्णायक गेममध्ये नेला. मात्र, तिसऱ्या गेममध्ये सात्विक आणि चिरागने ३३ शॉट्सची रॅली जिंकत १५-६ अशी आघाडी घेतली आणि सहज विजय मिळवला.

महिला एकेरीत नुकतीच तैपेई ओपन सुपर ३०० स्पर्धा जिंकणाऱ्या तन्वी शर्माचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. तन्वीला जपानच्या नवव्या मानांकित तोमोका मियाझाकी हिच्याकडून १७-२१, २१-१८, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो जोडीला चायनीज तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग आणि सू यिन हुई या जोडीकडून १८-२१, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार

...तरच व्यापार करार! भारताला सवलतीचे दर द्या; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा अमेरिकेला इशारा

Palghar : रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाचेची मागणी; तहसील कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले

Mumbai : बीकेसी-कुर्ला मार्गावर डबलडेकर बस चालवणे अशक्य; उंचीमुळे १५० नवीन ईव्ही डबलडेकर बस पुन्हा रखडल्या