Commonwealth Games 2026 : प्रवीण, सेल्व्हा अंतिम फेरीत दाखल 
क्रीडा

Commonwealth Games 2026 : प्रवीण, सेल्व्हा अंतिम फेरीत दाखल

भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर प्रवीण चित्रवेल आणि सेल्व्हा प्रभू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या तिहेरी उडी (ट्रिपल जंप) प्रकारात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Swapnil S

ग्लासगो : भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर प्रवीण चित्रवेल आणि सेल्व्हा प्रभू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या तिहेरी उडी (ट्रिपल जंप) प्रकारात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. गुरुवारी झालेल्या पात्रता फेरीत चित्रवेलने दुसरे, तर सेल्व्हा प्रभूने तिसरे स्थान पटकावून शनिवारी होणाऱ्या पदक फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

ग्लासगोमधील थंड आणि अत्यंत वारेशीर हवामानात पार पडलेल्या पात्रता फेरीत सहभागी १४ खेळाडूंपैकी एकालाही १६.६० मीटरची थेट पात्रता मर्यादा पार करता आली नाही. चित्रवेलने आपल्या पहिल्याच प्रयत्नात १६.४१ मीटरची उडी मारत दुसरे स्थान पटकावले. पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाल्याने त्याने दुसरा आणि तिसरा प्रयत्न केला नाही. १७.३७ मीटरचा राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या चित्रवेलची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी १७.०८ मीटर राहिली.

दुसरीकडे, सेल्व्हा प्रभूला सुरुवातीला मोठ्या दडपणाचा सामना करावा लागला. त्याचे पहिले दोन प्रयत्न फाऊल ठरल्याने त्याच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची टांगती तलवार होती. मात्र, तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने संयम राखत १६.२६ मीटरची उडी मारली आणि तिसऱ्या स्थानावर राहत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर विशाल टी. के. याचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर FDA चा बडगा; FSSAI परवाना नसल्याचे उघड

ॲग्रीगेटर कंपन्यांना १ सप्टेंबरपर्यंतची मुदत; नोंदणी न केल्यास कठोर कारवाई

E20 च्या वापराने मायलेज घटण्याचा संभव; केंद्र सरकारची संसदेत कबुली

जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या अध्यक्षतेखाली 'सीसीएस'ची बैठक; पुरवठा साखळीवरील संकटावर मंथन

गंभीर नियमभंग असेल तरच होते कारवाई, "मी स्वतःला सिंघम मानत नाही"; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची विशेष मुलाखत