क्रीडा

पहिल्याच सामन्यात डीआरएसची वादग्रस्त विकेट

वृत्तसंस्था

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने घेतलेली पाथुम निसंकाची विकेट वादाच्या भोवऱ्यात सापडली. श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रशिक्षक अतिशय नाराज झाले. दरम्यान, पहिल्याच सामन्याच्या दुसऱ्या षट्कात डीआरएसबाबत झालेला हा गोंधळ पुढील सामन्यांसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा होत आहे.

नवीनचा चेंडू निसंकाच्या बॅटला चाटून यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. मैदानावरील पंचांनी निसंकाला बाद ठरविले; मात्र निसंकाने डीआरएस घेतला. स्लो मोशन व्हिडीओत निसंकाच्या बॅटजवळून चेंडू जात असताना स्निकोमीटरमध्ये फारशी हालचाल दिसून आली नाही. कोणताही स्पाईक न दिसल्याने सर्वांना वाटले की, निसंका नाबाद आहे; मात्र थर्ड अम्पायरने निसंकाला बाद ठरवित सर्वांनाच धक्का दिला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फझल हक फारुकीने पहिल्याच षट्कात कुसल मेंडीस आणि चरिथ असलंका यांच्या विकेट घेत श्रीलंकेला पाठोपाठ दोन धक्के दिले. या दोन धक्क्यानंतर नवीन उल हकला निसंकाची विकेट मिळाली आणि श्रीलंकेला तिसरा धक्का बसला.

दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत पहिल्या दोन षटकातच श्रीलंकेची टॉप ऑर्डर उडविली. अफगाणिस्तानच्या फैजलहक फारुकीने श्रीलंकेला पहिल्याच षट्कात दोन धक्के दिले. त्याने कुसल मेंडिसला दोन धावांवर बाद केले.

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर चरिथ असलंकाला शून्यावर बाद करत दुसरा धक्का दिला.

यानंतर दुसऱ्या षट्कात नवीन उल हकला निसंकाची विकेट वादग्रस्तरीत्या मिळाली. यामुळे श्रीलंकेची अवस्था ३ बाद ५ धावा अशी झाली.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल