क्रीडा

Danushka gunathilaka : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केले दानुष्का गुणथिलकाला निलंबित!

संपूर्ण संघ रविवारी मायदेशी परतण्याच्या तयारी असताना ऑस्ट्रेलिया पोलिसांनी श्रीलंकेचा खेळाडू दानुष्का गुणथिलकाला (Danushka gunathilaka) अटक केली. त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.

प्रतिनिधी

सध्या ऑस्ट्रलियामध्ये सुरु असलेली आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२२ (ICC T20 World Cup) ही अनेक घटनांनी लक्षात राहणारी ठरली. (Danushka gunathilaka) श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर जाताजाता एक धक्कादायक प्रकार घडला आणि संपूर्ण क्रिकेटविश्व थक्क झाले. संपूर्ण संघ रविवारी मायदेशी परतण्याच्या तयारी असताना ऑस्ट्रेलिया पोलिसांनी श्रीलंकेचा खेळाडू दानुष्का गुणथिलकाला अटक केली. त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. सध्या तो तुरुंगात असून त्यांच्यासमोरील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. कारण, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला सर्वच प्रकारांमधून निलंबित केले आहे.

दानुष्का गुणथिलकाला अटक झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्व हादरले होते. श्रीलंकेची संपूर्ण टीम ही मायदेशी परतली आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यावर काय प्रतिक्रिया देते? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. अखेर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, दानुष्का गुणथिलाकावर ऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. यामुळे त्याला अटकदेखील करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींची माहिती मिळाल्यानंतरच श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला आहे. तो यापुढे क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात निवडीसाठी पात्र नसणार आहे.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क