भारताचे तिरंदाजी प्रशिक्षक अद्यापही वेतनाच्या प्रतीक्षेत; डेव्ह क्युझन्स यांची तिरंदाजी संघटनेला देश सोडण्याची धमकी; पदाधिकाऱ्यांकडून सारवासारव X
क्रीडा

भारताचे तिरंदाजी प्रशिक्षक अद्यापही वेतनाच्या प्रतीक्षेत; डेव्ह क्युझन्स यांची तिरंदाजी संघटनेला देश सोडण्याची धमकी; पदाधिकाऱ्यांकडून सारवासारव

भारताच्या कंपाऊंड तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत या प्रकारात देशासाठी प्रथमच ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे. मात्र, या ऐतिहासिक यशामागे मार्गदर्शन करणारे भारताचे विदेशी मुख्य प्रशिक्षक डेव्ह क्युझन्स पदभार स्वीकारल्यापासून तीन महिन्यांहून अधिक काळ आपल्या वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताच्या कंपाऊंड तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत या प्रकारात देशासाठी प्रथमच ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे. मात्र, या ऐतिहासिक यशामागे मार्गदर्शन करणारे भारताचे विदेशी मुख्य प्रशिक्षक डेव्ह क्युझन्स पदभार स्वीकारल्यापासून तीन महिन्यांहून अधिक काळ आपल्या वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्यात भारताचे मुख्य कंपाउंड प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेले अमेरिकेचे डेव्ह क्युझन्स यांनी, थकीत वेतन न मिळाल्यास देश सोडण्याची आणि राजीनामा देण्याची धमकी दिल्यासारखी भूमिका घेतली आहे.

या प्रकरणी भारतीय तिरंदाजी महासंघाचे (एएआय) कोषाध्यक्ष डॉ. जोरिस पॉलुस उम्माचेरिल आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) एका अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक कारणामुळे हा उशीर झाला असून ही समस्या आता सोडवण्यात आली आहे आणि दोन दिवसांत सर्व देणी अदा केली जातील. क्युझन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले आहे.

दरम्यान, लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिक डोळ्यांसमोर ठेवून भारतीय तिरंदाजी महासंघ दक्षिण कोरियाच्या पार्क चाई-सून यांच्याशी रिकर्व्ह कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी वाटाघाटी करत आहे. एकामागून एक यश मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकांच्या वेतनात झालेला हा उशीर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. डोंगरएवढे यश मिळवून दिल्यानंतरही मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागल्याने क्युझन्स प्रचंड नाराज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ऑलिम्पिकमध्ये कंपाउंड प्रकारातील मिश्र सांघिक स्पर्धा पहिल्यांदाच समाविष्ट होत असून, त्यासाठी क्युझन्स यांच्यावर भारताच्या कंपाउंड कार्यक्रमाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्गिओ पाग्नी यांच्या जागी आलेले ४९ वर्षीय अमेरिकन प्रशिक्षक क्युझन्स हे माजी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे खेळाडू राहिले असून, त्यांनी १९९९ आणि २००३ मध्ये जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहिल जाधव आणि चिकीथा तनीपर्थी या नवीन जोडीने भारताला पहिला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला.

पदकसंख्येत तिरंदाजीचे योगदान

चीनने सलग १२व्यांदा पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले. त्यांनी १६९ सुवर्ण, ८९ रौप्य आणि ८३ कांस्यपदकांसह एकूण ३४१ पदके जिंकत परदेशातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके मिळवत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. २०२३च्या हांगझो येथील स्पर्धेच्या तुलनेत भारताची २१ पदके कमी झाली. मात्र भारताने २०२३ प्रमाणेच यंदाही पदकतालिकेत चौथे स्थान कायम राखले. तिरंदाजीत भारताने कंपाऊंड प्रकारात तिहेरी सुवर्ण पटकावले. तसेच एकेरीतही अनेक पदके कमावली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला