क्रीडा

भारतीय क्रिकेटमध्ये जे कोणालाही जमलं नाही ते दिप्ती शर्माने करून दाखवलं; नावावर केला हा विक्रम

भारतीय महिला संघाच्या दीप्ती शर्माने टी-२०मध्ये युझवेंद्र चहलला देखील मागे टाकत केला ऐतिहासिक विक्रम

प्रतिनिधी

सध्या भारतीय महिला संघ हा आयसीसी महिला टी - २० विश्वचषक २०२३मध्ये चांगली कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेत एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. तिने या ३ विकेट्स घेत आंतराष्ट्रीय टी-२०मध्ये १०० विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली आहे.

पुरुष आणि महिला अशा दोन्ही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळींचा टप्पा गाठणारी दीप्ती पहिली भारतीय ठरली. तीने ८९ सामन्यात १०० विकेट्स घेतल्या आहेत. पूनम यादवच्या ९८ विकेट्सला मागे टाकत हा विक्रम केला. तसेच, भारतीय सांघीच्या पुरुष क्रिकेटपटूंमधून युझवेंद्र चहलच्या नावावर सर्वाधिक त्याने ९१ विकेट्स आहेत. त्यामुळे दीप्तीने केलेल्या या कामगिरीचे सर्वच क्रिकेटप्रेमींकडून कौतुक होत आहे.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव