पीटीआय
क्रीडा

विराट कोहलीला कमी लेखू नका; बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी रिकी पाँटिंगने दिला इशारा

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला त्याच्या सध्याच्या खराब फॉर्ममुळे कमी लेखू नका. हा स्टार खेळाडू आगामी पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत आपला दर्जा दाखवून देईल...

Swapnil S

दुबई : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला त्याच्या सध्याच्या खराब फॉर्ममुळे कमी लेखू नका. हा स्टार खेळाडू आगामी पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत आपला दर्जा दाखवून देईल, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाच्या संघाला दिला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. भारताला ही मालिका जिंकायची असेल तर कोहली त्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल, असे पाँटिंगला वाटते.

नुकत्याच झालेल्या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा त्यांच्या घरातच ०-३ असा मानहानीकारक पराभव केला. या मालिकेच्या सहा डावांत कोहलीने केवळ ९३ धावा केल्या. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग म्हणाला की, मला कोहलीच्या लढाऊ क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. तो या खेळातील महान खेळाडू आहे यात शंका नाही. त्याचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्डही खूप चांगला आहे. बॉर्डर- गावसकर मालिकेमुळे कोहलीच्या कसोटी कारकीर्दीला संजीवनी मिळू शकेल, असा विश्वास पाँटिंगने व्यक्त केला.

फिरकी खेळण्याचे भारतीयांचे कौशल्य पूर्वीसारखे नाही

नुकतेच न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर भारताला व्हाईटवॉशचा धक्का बसला. १२ वर्षांत घरच्या मैदानावर यजमानांचा हा पहिलाच कसोटी मालिका पराभव होता. न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेतील निराशाजनक कामगिरीबद्दल पॉटिंग म्हणाला की, असे दिसते की फिरकी खेळण्याचे आधुनिक भारतीय फलंदाजांचे कौशल्य पूर्वीसारखे नसावे. अलीकडे वेगवान गोलंदाजांना अनुकूल बनलेल्या भारतीय खेळपट्ट्यांच्या स्वरूपातील बदल हा पराभवास कारणीभूत ठरू शकतो, असेही पाँटिंग पुढे म्हणाला.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी