संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

Duleep Trophy 2025: पूर्व विभागाचे नेतृत्व किशनकडे; शमी, आकाशचाही समावेश

पूर्व विभागाचे नेतृत्व भारताचा युवा डावखुरा फलंदाज इशान किशनकडे सोपवण्यात आले आहे. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला मात्र...

Swapnil S

कोलकाता : यंदाच्या दुलिप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी पूर्व विभागाचे नेतृत्व भारताचा युवा डावखुरा फलंदाज इशान किशनकडे सोपवण्यात आले आहे. तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसुद्धा या संघाचा भाग आहे.

किशनने गेल्या काही काळात भारतीय संघातील स्थान गमावले आहे, तर शमी फक्त एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतो. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर शमी एकही आंतरराष्ट्रीय लढत खेळलेला नाही. आकाश दीप, मुकेश कुमार, रियान परागही पूर्व विभागाचा भाग आहेत. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला मात्र राखीव खेळाडूंत ठेवण्यात आले आहे.

पूर्व विभाग संघ

इशान किशन (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, संदीप पटनाईक, विराट सिंग, देनिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र, रियान पराग, उत्कर्ष सिंग, सुरज जैस्वाल, मुकेश कुमार, आकाश दीप, मोहम्मद शमी. राखीव : वैभव सूर्यवंशी, सुदीप कुमार, राहुल सिंग.

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती

ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; नऊ विमाने वेगवेगळ्या ठिकाणी उतरवली