क्रीडा

डायनॅमिक खो-खो लीग; माहीम वॉरियर्सची जेतेपदाला गवसणी! अंतिम फेरीत परेल रुद्राजवर २०-१९ अशी सरशी

दादरमधील अमरवाडी मैदान, गोखले रोड येथे झालेल्या या स्पर्धेत परेल रुद्राजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Swapnil S

मुंबई : अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या डायनॅमिक खो-खो लीगमध्ये माहीम वॉरियर्सने विजेतेपदावर नाव कोरले. दादरमधील अमरवाडी मैदान, गोखले रोड येथे झालेल्या या स्पर्धेत परेल रुद्राजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. माहीमच्या रोहन टेमकरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

गेल्या आठवडाभर थरारक सामन्यांनी रंगलेल्या या स्पर्धेतील अंतिम लढतीत माहीमने परेलवर २०-१९ अशी अवघ्या एका गुणाच्या फरकाने मात केली. माहीमने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रम करताना सलग सात सामने जिंकले. अंतिम सामन्यात मध्यंतराला माहीमचा संघ ९-१० असा पिछाडीवर होता. मात्र रोहन (२.३० मिनिटे संरक्षण व आक्रमणात १ गडी), जर्नादन सावंत (२.१० मि., १ गडी) व ओमकार मिरागळ (६ गडी) या त्रिकुटाने चमकदार कामिगरी करून माहीमचा विजय साकारला. परेलकडून करळ गारोळे (२.१० मि.), रोहित परब (६ गडी) यांनी कडवी झुंज दिली.

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात वरळी फिनिशर्सने दादर पँथर्सला १३-३ अशी धूळ चारली. तत्पूर्वी, उपांत्य लढतींमध्ये माहीमने टायब्रेकरमध्ये लघुत्तम आक्रमणात दादरवर ५४ सेकंदांच्या फरकाने सरशी साधली, तर परेलने वरळीवर २०-१६ असा विजय मिळवला होता. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांच्या हस्ते पार पडला.

वैयक्तिक पुरस्कार विजेते

  • सर्वोत्तम आक्रमक : ओमकार मिरागळ (माहीम वॉरियर्स)

  • सर्वोत्तम संरक्षक : करण गारोळे (परेल रुद्राज)

  • सर्वोत्तम अष्टपैलू : रोहन टेमकर (माहीम वॉरियर्स)

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन