olympics.com
क्रीडा

...म्हणून ऑलिम्पिकसाठी सीन नदी स्वच्छ करण्यावर भर!

Swapnil S

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ट्रायथलॉन आणि मॅरेथॉन या दोन जलतरण स्पर्धा सीन नदीत होणार आहेत. स्पर्धेला दोनच आठवड्यांचा कालावाधी बाकी राहिला असून, तोपर्यंत सीन नदी स्वच्छ राहणार का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात आयोजक गर्क आहेत.

नदीच्या स्वच्छतेसाठी पॅरिसने पावसाच्या कालावधीत वाहणारे पाणी साठवण्यासह पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अब्जावधी डॉलर गुंतवले होते. पण, तेच जिवाणूंनी भरलेले पाणी अतिवृष्टीच्या काळात नदीत सोडण्यात येते आणि अशा पाण्यात पोहणे असुरक्षित असते. कायमच प्रदूषित राहणारी नदी स्वच्छ करण्याचे प्रयत्न असूनही त्याला शंभर टक्के यश मिळत नसल्याचे समोर आले आहे. अलीकडच्या काळात घेण्यात आलेल्या पाण्याच्या चाचणीनंतर ते पोहण्यासाठी योग्य नाही असे मानले जात आहे.

पॅरिसच्या अधिकाऱ्यांनी मे महिन्यात ऑस्टरलिट्झ रेल्वे स्थानकाशेजारी एक विशाल भूमिगत जलसाठवण खोऱ्याची निर्मिती केली होती. पावसाचे अतिरिक्त पाणी साठविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली होती. येथे जमा होणारे पाणी हे सुमारे २० ऑलिम्पिक तरण तलावाइतके भरते. स्पर्धेसाठी घाईने याची निर्मिती करताना काही त्रुटी राहिल्या असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता तपासली जात आहे. यानंतरही सीन नदीतील पाण्याच्या गुणवत्तेविषयी आयोजन अजूनही आशावादी आहेत. कारण, येथे बरेच दिवस पाऊस पडलेला नाही. सीन नदीचे पाणी स्वच्छ असल्याचे दाखवून देण्यासाठी फ्रान्सच्या क्रीडा मंत्री ॲमेली क्वाडेआ कॅस्टेरा स्वत: पोहण्यासाठी नदीत उतरल्या होत्या.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था