Photo : X
क्रीडा

ब्रूक नवा उपकर्णधार, वूड,जॅक्सचे पुनरागमन; दोन महिन्यांपूर्वीच इंग्लंडचा ॲशेससाठी संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणाऱ्या प्रतिष्ठेच्या ॲशेस कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने दोन महिने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज मार्क वूडचे पुनरागमन झाले असून ओली पोपऐवजी हॅरी ब्रूककडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

Swapnil S

लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणाऱ्या प्रतिष्ठेच्या ॲशेस कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने दोन महिने आधीच आपला संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज मार्क वूडचे पुनरागमन झाले असून ओली पोपऐवजी हॅरी ब्रूककडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तसेच अष्टपैलू विल जॅक्सला अनपेक्षितपणे संघात स्थान लाभले आहे.

बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून २१ नोव्हेंबरपासून उभय संघांत पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. पर्थ येथे पहिली कसोटी झाल्यानंतर अनुक्रमे ब्रिस्बेन (४ ते ८ डिसेंबर), ॲडलेड (१७ ते २१ डिसेंबर), मेलबर्न (२६ ते ३० डिसेंबर) व सिडनी (४ ते ८ जानेवारी) येथे दुसरी ते पाचवी कसोटी खेळवण्यात येईल.

त्यापूर्वी इंग्लंडचा संघ ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी ३ टी-२० व ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. १८ ऑक्टोबरपासून इंग्लंडच्या न्यूझीलंड दौऱ्याला प्रारंभ होईल. या मालिकेसाठीसुद्धा इंग्लंडचे संघ जाहीर झाले आहेत. स्टोक्स व जॅक्स सध्या जायबंदी असले, तरी ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तंदुरुस्त होतील, असे व्यवस्थापनाला अपेक्षित आहे.

इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथल, हॅरी ब्रूक, ब्रेडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, विल जॅक्स, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, मार्क वूड.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली