क्रीडा

इंग्लंडचे माजी फिरकीपटू डेरेक अंडरवूड यांचे निधन

Swapnil S

लंडन : इंग्लंडचे महान फिरकीपटू डेरेक अंडरवूड यांचे वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. कौंटी स्पर्धेतील केंट या संघांना याविषयी माहिती दिली.

१९६३ ते १९८७ दरम्यान प्रोफेशनल क्रिकेट खेळलेल्या अंडरवूड यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत तीन हजारांहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. अंडरवूड यांनी इंग्लंडकडून १९६६ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८६ कसोटी सामने खेळताना २९७ बळी मिळवले होते. तसेच त्यांनी २६ एकदिवसीय सामनेही खेळले, ज्यात त्यांनी ३२ विकेट्स घेतल्या. अंडरवूड यांनी १९७५ सालच्या विश्वचषकातही इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यांची अविस्मरणीय कामगिरी १९६८ च्या मालिकेतील द ओव्हल मैदानावरील कसोटीत झाली. त्यांनी ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यावेळी सामना संपायला अवघे ६ मिनिटे राहिलेले असताना इंग्लंडने तो सामना जिंकला होता, त्यामुळे मालिका बरोबरीवर संपली होती.

दरम्यान, अंडरवूड इंग्लंडचे सर्वात यशस्वी फिरकीपटू आहेत. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांच्या यादीत ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर फिरकीपटूंमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत.

“नेहमीप्रमाणे त्यांचं रडगाणं सुरु झालंय...”, उद्धव ठाकरेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर!

"सकाळी पाच-सहा वाजले, तरी त्यांना..." उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

सिगारेट पिऊन चालली होती थट्टा मस्करी, टवाळखोर तरुणांनी मित्रालाच केली बेदम मारहाण

"४ जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू," चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

EVM मशिनला हार घालणं भोवणार? शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल