क्रीडा

मुंबईसमोर बिहारची पडझड;वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीचे चार बळी,रणजी क्रिकेट स्पर्धा

Swapnil S

पाटणा : मुंबईचा पहिला डाव अवघ्या २५१ धावांवर आटोपल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांसमोर यजमान बिहारच्या फलंदाजांनीही नांगी टाकली. वेगवान गोलंदाज मोहित अवस्थी आणि शिवम दुबे यांनी बिहारला सुरुवातीलाच धक्के दिल्यामुळे त्यांची अवस्था दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ८९ अशी झाली आहे.

कालच्या ९ बाद २३५ धावसंख्येवरून खेळताना मुंबईने शनिवारी १६ धावांची भर घेतली. मोहित अवस्थी १५ धावा काढून माघारी परतला. त्यामुळे मुंबईला ७६.२ षटकांत सर्वबाद २५१ धावा करता आल्या. मुंबईकडून भूपेन ललवानीने सर्वाधिक ६५ तर सुवदे पारकर (५०) आणि तनुष कोटियन (५०) यांनी अर्धशतके झळकावली. शिवम दुबेने ४१ धावांचे योगदान दिले.

मुंबईच्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोहित अवस्थीने पहिल्याच षटकांत बिहारला पहिला धक्का दिला. त्याने पाचव्या चेंडूवर शर्मन निगरोध (२) याचा अडसर दूर केला. त्यानंतर शिवम दुबेने वैभव सूर्यवंशी याला रॉयस्टन डायसकरवी झेलबाद करत बिहारला आणखीनच संकटात आणले. वैभव सूर्यवंशीने १९ धावा केल्या. अवस्थीने त्याच धावसंख्येवर बाबुल कुमार (८) याला बाद करत बिहारची अवस्था ३ बाद ३० अशी केली. त्यानंतर आकाश राज आणि साकीबुल गनी (२२) यांनी बिहारचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अवस्थीने २९व्या षटकांत लागोपाठच्या दोन चेंडूंवर साकीबुल आणि बिपीन सौरभ (०) यांना बाद करत बिहारची अवस्था ५ बाद ७० अशी बिकट केली. शेवटच्या काही तासाच्या खेळात शिवम दुबेने सचिन कुमारचा (५) त्रिफळा उडवत मुंबईला सहावे यश मिळवून दिले. त्यामुळे दिवसअखेर बिहार ६ बाद ८९ अशा स्थितीत असून आकाश राज २६ धावांवर खेळत आहे.

का वाढेना मतदानाचा टक्का?

जपायला हवा, दाभोलकरांचा वारसा

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?