FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा बोलबाला; जपानचा सायोनारा X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : ब्राझीलचा बोलबाला; जपानचा सायोनारा

२५ वर्षीय आक्रमणपटू गॅब्रिएल मार्टिनेलीने भरपाई वेळेत (९०+६ मिनिट) केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर ब्राझीलने फिफा विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना जपानचा २-१ असा पराभव केला. याबरोबरच ब्राझीलने गेल्या अनेक विश्वचषकांपासून सुरू असलेली किमान उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याची मालिका कायम राखली, तर जपानला सलग तिसऱ्या विश्वचषकात नॉकआऊट फेरीतील पहिल्याच लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Swapnil S

ह्युस्टन : २५ वर्षीय आक्रमणपटू गॅब्रिएल मार्टिनेलीने भरपाई वेळेत (९०+६ मिनिट) केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर ब्राझीलने फिफा विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना जपानचा २-१ असा पराभव केला. याबरोबरच ब्राझीलने गेल्या अनेक विश्वचषकांपासून सुरू असलेली किमान उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याची मालिका कायम राखली, तर जपानला सलग तिसऱ्या विश्वचषकात नॉकआऊट फेरीतील पहिल्याच लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.

ह्युस्टन स्टेडियमवरील या लढतीत २९व्या मिनिटाला कैशू सानो याने गोल करून जपानला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली. मात्र, ५६व्या मिनिटाला अनुभवी कॅसेमिरोने हेडरद्वारे गोल करून ब्राझीलला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच इंजरी टाइममध्ये मार्टिनेलीने अप्रतिमरित्या बचावपटूंना चकवले व ब्राझीलला २-१ असा विजय मिळवून दिला. ब्रुनोने दिलेला पासदेखील तितकाच कौतुकास्पद होता. ब्राझीलसमोर आता नॉर्वे किंवा आयव्हरी कोस्टचे आव्हान असेल.

चार वर्षांपूर्वी कतार येथील विश्वचषकातही जपानने सुरुवातीला आघाडी घेतली होती, परंतु उपउपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाकडून त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच २०१८मध्ये बेल्जियमविरुद्ध २-० अशी आघाडी घेतल्यानंतरही जपानचा ३-२ असा पराभव झाला होता. जपानने ब्राझीलविरुद्ध खेळलेल्या एकूण १५ सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला असून दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.

हा सामना जपानमध्ये पहाटे ४ वाजता संपला तरी टोकियो टॉवरजवळ मोठ्या संख्येने चाहत्यांनी एकत्र येत सामना पाहिला. खेळाडूंनी शेवटपर्यंत दिलेली झुंज कौतुकास्पद होती आणि यामुळे आपल्याला जीवनात आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा मिळाल्याचे टोकियोमधील चाहती मियू हाशिगुची हिने सांगितले. तर मोठ्या संघाविरुद्ध जपानने पहिला गोल करणे ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याचे २० वर्षीय विद्यार्थी रियुतैरो मोरी याने नमूद केले.

दरम्यान, नेयमार या लढतीत मैदानात उतरला नाही. त्याला पूर्ण वेळ मैदानाबाहेर ठेवण्यात आले. आता पुढील फेरीसाठी तो तंदुरुस्त असेल, असे अपेक्षित आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड