कापे व्हर्डेची बाद फेरीत धडक; सौदी अरेबियाविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत x
क्रीडा

FIFA World Cup 2026 : कापे व्हर्डेची बाद फेरीत धडक; सौदी अरेबियाविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कापे व्हर्डने सौदी अरेबियाविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत राखत बाद फेरीत धडक मारली आहे. बाद फेरीत प्रवेश करणारा कापे व्हर्डे हा स्पर्धेतील सर्वात लहान देश ठरला आहे. ५ लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्या आफ्रिकी देशाने पहिल्याच प्रयत्नात चमकदार कामगिरी करत फुटबॉलविश्वात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Swapnil S

ह्युस्टन (एपी) : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कापे व्हर्डने सौदी अरेबियाविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत राखत बाद फेरीत धडक मारली आहे. बाद फेरीत प्रवेश करणारा कापे व्हर्डे हा स्पर्धेतील सर्वात लहान देश ठरला आहे. ५ लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्या आफ्रिकी देशाने पहिल्याच प्रयत्नात चमकदार कामगिरी करत फुटबॉलविश्वात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कापे व्हर्डेने सलामीच्या सामन्यात २०१०च्या विश्वविजेत्या स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखले होते, तर उरुग्वेविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली होती. विशेष म्हणजे, कापे व्हर्डेने साखळी फेरीतील तिन्ही सामने बरोबरीत सोडवले. त्यामुळे गटात तीन गुणांसह कापे व्हर्डे दुसऱ्या स्थानावर राहिला. स्पेनने उरुग्वेचा पराभव केल्यामुळे त्यांना गटात पहिले स्थान मिळाले. बाद फेरीत आता कापे व्हर्डेचा सामना ३ जुलै रोजी मियामी येथे गतविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे.

कापे व्हर्डेचा ४० वर्षीय गोलकिपर वोझिन्हाने या सामन्यात अफलातून कामगिरी केली. पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत त्याने मोहम्मद कानोचा हेडर रोखून सौदी अरेबियाला गोल करण्यापासून रोखले. ६६व्या मिनिटाला मोहम्मद अबू अल-शमतचा फटका त्याने उत्कृष्टरित्या अडवला, तर ९२व्या मिनिटाला अब्दुल्ला अल-हंदनचा गोलचा प्रयत्नही त्याने हाणून पाडला.

स्पर्धेतील या कामगिरीमुळे वोझिन्हाचे इन्स्टाग्रामवर १६ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. कापे व्हर्डेचे प्रशिक्षक बुबिस्टा यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून, खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक केले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा

...तर ठाण्यातील क्लस्टरवर विश्वास कसा ठेवायचा? केदार दिघेंचा महापालिकेला सवाल

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

फिल्मसिटीतील मैदानाला GMLR चा फटका; १७४ कोटी नुकसानभरपाई देण्याची महामंडळाची मागणी, BMC कडून २० कोटी देण्याचा प्रस्ताव