जपान-स्वीडनची बरोबरी; दोघांनीही गाठली बाद फेरी X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : जपान-स्वीडनची बरोबरी; दोघांनीही गाठली बाद फेरी

फिफा विश्वचषकात एफ-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात जपान आणि स्वीडन यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र दोन्ही संघांना शेवटी १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. जपानने ३ सामन्यांतील ५ गुणांसह दुसरे स्थान मिळवून आगेकूच केली, तर स्वीडनने ३ सामन्यांत ४ गुण मिळवून तिसरे स्थान पटकावत बाद फेरी गाठली. तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघांच्या नियमाचा स्वीडनला लाभ झाला.

Swapnil S

अर्लिंग्टन : फिफा विश्वचषकात एफ-गटातील अखेरच्या साखळी सामन्यात जपान आणि स्वीडन यांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र दोन्ही संघांना शेवटी १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. जपानने ३ सामन्यांतील ५ गुणांसह दुसरे स्थान मिळवून आगेकूच केली, तर स्वीडनने ३ सामन्यांत ४ गुण मिळवून तिसरे स्थान पटकावत बाद फेरी गाठली. तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघांच्या नियमाचा स्वीडनला लाभ झाला.

डल्लास स्टेडियमवरील या सामन्याच्या ५६व्या मिनिटाला जपानच्या दाइझेन माएदा याने रित्सू दोआन याच्या पासवर गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. जपानचा या स्पर्धेतील हा सातवा गोल ठरला असून, एका विश्वचषकातील ही त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे. मात्र, ही आघाडी अवघी सहा मिनिटे टिकली. ६२व्या मिनिटाला स्वीडनच्या अँथनी एलंगा याने बॉक्सच्या बाहेरून डाव्या पायाने जोरदार फटका लगावत गोल नोंदवला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला. एलंगाचा या स्पर्धेतील हा दुसरा गोल आहे.

जपानने या विजयासह सलग तिसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. एफ गटामध्ये नेदरलँड्सनंतर जपानने दुसरे स्थान पटकावले असून, आता सोमवारी त्यांची लढत ह्युस्टन येथे बलाढ्य ब्राझीलशी होणार आहे. दुसरीकडे, स्वीडनने १९९४ नंतर विश्वचषकासाठी पात्र ठरल्यानंतर प्रत्येक वेळी बाद फेरीत प्रवेश करण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. स्वीडनचा बाद फेरीतील प्रतिस्पर्धी अद्याप ठरलेला नाही.

सामन्याच्या अखेरच्या क्षणी स्वीडनच्या एलंगाने गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु जपानचा गोलकीपर झिऑन सुझुकी याने चपळाई दाखवत तो फटका अडवला. त्यानंतर मिळालेल्या कॉर्नर किकवरही सुझुकीने अलेक्झांडर इसाक याचा हेडर उत्कृष्टपणे रोखला. ७०,१३७ प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी खेळावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी सामना बरोबरीत राहिला.

जपानने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची बाद फेरी गाठली, तर स्वीडनने २०१८नंतर प्रथमच बाद फेरीत प्रवेश केला.

आजचे सामने

इंग्लंड वि. पनामा - (मध्यरात्री २.३० वाजता)

क्रोएशिया वि. घाना - (मध्यरात्री १२.३० वाजता)

पोर्तुगाल वि. कोलंबिया - (रविवारी पहाटे ५ वाजता)

काँगो वि. उझबेकिस्तान - (रविवारी पहाटे ५ वाजता)

अर्जेंटिना वि. जॉर्डन - (रविवारी सकाळी ७.३० वाजता)

अल्जेरिया वि. ऑस्ट्रिया - (रविवारी सकाळी ७.३० वाजता)

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड