संग्रहित छायाचित्र (ट्विटर)
क्रीडा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने पाकिस्तानात यावे! पीसीबी अध्यक्षांचे वक्तव्य

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पुढील वर्षी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे आयोजन करणे हेच आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे वक्तव्य केले असून भारताने आधी पाकिस्तानात खेळावे, मगच द्विदेशीय मालिकेबाबत विचार करू, असेही मत व्यक्त केले.

Swapnil S

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पुढील वर्षी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे आयोजन करणे हेच आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे वक्तव्य केले असून भारताने आधी पाकिस्तानात खेळावे, मगच द्विदेशीय मालिकेबाबत विचार करू, असेही मत व्यक्त केले.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात प्रतिक्रिया देताना नक्वी म्हणाले, “यासाठी आमच्याकडे काही पर्याय उपलब्ध झाले, तर त्याचा आम्ही जरुर विचार करू. मात्र, सध्या तरी आम्ही चॅम्पियन्स स्पर्धेच्या आयोजनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताला आधी या स्पर्धेसाठी पाकिस्तानात येऊ द्या.” २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. फक्त आयसीसी स्पर्धा म्हणजेच विश्वचषक अथवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे दोन संघ आमनेसामने येतात. २०१२मध्ये पाकिस्तानचा संघ मात्र भारत दौऱ्यावर आला होता. भारताने २००७ नंतर पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळलेला नाही. “आमच्या संघाचा व्यग्र कार्यक्रम आणि नंतर होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा लक्षात घेता द्विदेशीय मालिकेची सांगड घालणे सध्या तरी अवघड दिसत आहे,” असेही नक्वी म्हणाले.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन