क्रीडा

गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआय सचिव जय शाह यांची घोषणा

Suraj Sakunde

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी भारतीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक असतील. ते राहुल द्रविडची जागा घेणार आहे. टीम इंडिया २०२४ टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता.

तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक:

गौतम गंभीर तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक असतील. सर्व फॉरमॅटसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमणार नसल्याचे जय शहा यांनी आधीच सांगितले होते. गंभीर यांचा कार्यकाळ साडेतीन वर्षांचा असेल. बीसीसीआयने मे महिन्यात अर्ज मागवले होते. यानंतर दोन जणांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये गंभीर व्यतिरिक्त भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांच्या नावाचा समावेश होता. मात्र, आता जय शाह यांनी गौतम गंभीर यांच्या नावाची घोषणा केली आहे.

जय शाहांनी केली घोषणा:

गंभीर यांच्या नावाची घोषणा करताना जय शाह म्हणाले की, "टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या नावाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मी त्यांचे स्वागत करतो. आधुनिक क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतम यांनी या बदलत्या परिस्थितीला जवळून पाहिले आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी कठीण परिस्थितीचा सामना केला आणि विविध भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहेत."

जय शाह यांनी लिहिले की, "संघासाठी त्यांची स्पष्ट दृष्टी, आणि अफाट अनुभव, त्यांना या रोमांचक आणि सर्वाधिक मागणी असलेली कोचिंग भूमिका निभावण्यासाठी पुर्णपणे सक्षम बनवतो. गंभीर यांच्या या नव्या प्रवासाला बीसीसीआय पूर्ण समर्थन करत आहे."

गंभीर यांच्यासमोर काय असेल आव्हान?

केकेआर आणि लखनऊ सुपरजायंट्ससह गंभीर आयपीएलमध्ये एक उत्कृष्ट रणनीतीकार म्हणून उदयास आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली केकेआरला दोनदा चॅम्पियन बनवले. तसेच, त्यांनी लखनौला दोन हंगामात (२०२२, २०२३) प्लेऑफमध्ये नेले. २०२४ मध्ये, कोलकाता नाईट रायडर्सचे मार्गदर्शक असताना त्यांनी त्यांना चॅम्पियन बनवले. गंभीर यांचे व्यवस्थापन कौशल्य उत्कृष्ट आहे. गंभीर यांचा कार्यकाळ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ असा असेल. म्हणजेच त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ आणि २०२७, टी-२० वर्ल्ड कप २०२६ आणि एकदिवसीय वर्ल्ड कप २०२७ खेळणार आहे. म्हणजेच गंभीरकडे तीन मर्यादित षटकांचे विश्वचषक आणि दोन आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याचे आव्हान आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था