संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

महाराष्ट्रातील खो-खोपटूंना आता सरकारी नोकरी! क्रीडा विभागाकडून यादी जाहीर; राज्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश

क्रीडा विभागाकडून यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्ती करण्यात आलेल्या ९५ पैकी ३२ जागांवर खो-खो खेळाडूंचा समावेश आहे. त्यात ११ क्रीडा अधिकारी (गट ब राजपत्रित) आणि २१ शिपाई (गट ड) पदावर नियुक्त झाले आहेत. क्रीडा विभागाकडून यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या थेट नियुक्तीसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर पदे निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये लिपिक आणि शिपाई पदावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने यादी जाहीर केली आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

नियुक्त झालेल्या खेळाडूंच्या यादीत अमृती कोकितकर, ऐश्वर्या सावंत, नरेश सावंत, दिपाली सबाने, योगेश मोरे, सुयश गरगटे, प्रियंका इंगळे, गौरी शिंदे, निकिता पवार, अक्षय भांगरे यांची क्रीडा अधिकारी पदासाठी, तर शिपाई पदावर सोनाली मोकासे, प्रियंका येळे, श्वेता गवळी, मिनल भोईर, पौर्णिमा सकपाळ, रेश्मा राठोड, प्रियंका भोपी, मिलिंद कुरपे, सागर पोतदार, जान्हवी पेठे, काजल भोर, किरण शिंदे, ऋतुजा खरे, प्रिती काळे, अविनाश देसाई, विजय शिंदे, निखिल मस्के, सुशांत कलढोणे, फैजान पठाण, संपदा मोरे, मयुरी पवार यांचा समावेश आहे. याआधीही आयकर विभागात खोखो खेळाडूंची भरती झाली होती.

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, क्रीडायुक्त राजेश देशमुख यांचे खो-खो संघटनेचे पदाधिकारी व खो-खोप्रेमींनी जाहीर आभार मानले आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी