क्रीडा

९४ वर्षीय आजींची कमाल, १०० मीटर स्प्रिंट प्रकारात पटकावले सुवर्णपदक

वृत्तसंस्था

फिनलंडमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेमध्ये भगवानीदेवी डागर यांनी १०० मीटर स्प्रिंट(वेगात चालणे) प्रकारात सुवर्णपदक मिळविले. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वजण थक्क झाले आहेत.

भगवानीदेवी यांनी १०० मीटर अंतर २४.७४ सेकंदात पार केले. याशिवाय त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी कांस्यपदक मिळविले. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला अनेकांनी सलाम केला आहे.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानीदेवींचा फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले आहे. मंत्रालयाने लिहिले, भारतातील ९४ वर्षीय भगवानीदेवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.

भगवानीदेवींचा नातू विकास डागर हादेखील पॅराअ‍ॅथलीट असून त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याची आजी असलेल्या भगवानीदेवींनी यांनीदेखील पदके जिंकली आहेत.

चेन्नई येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानीदेवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवीला.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन