क्रीडा

माजी कर्णधार बॉब विलिस यांना अभिवादन

इंग्लंडमध्ये २ जुलै हा बॉब विलिस यांचा दिवस साजरा केला जात आहे.

वृत्तसंस्था

इंग्लंडविरुध्दच्या पुनर्नियोजित कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी खेळ सुरू होण्यापूर्वी भारत-इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावरत रांगेत उभे राहून ४५ सेंकंद टाळ्या वाजवत इंग्लंडचे माजी कर्णधार बॉब विलिस यांना अभिवादन केले. इंग्लंडमध्ये २ जुलै हा बॉब विलिस यांचा दिवस साजरा केला जात आहे.

पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि अशा रुग्णांच्या उपचारासाठी निधी जमा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बॉब प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण होते. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आपल्या उतारवयात त्यांनी प्रोस्टेट कॅन्सरसाठी जागृती मोहीम हाती घेतली होती. विलिस हे इंग्लंड क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू होते. १९८१ च्या अॅशेस विजयासाठी त्यांना ओळखले जाते. चौथ्या डावात त्यांनी घेतलेल्या आठ बळींमुळे इंग्लंडला अतिशय कमी धावसंख्येचा बचाव करता आला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विलिस समालोचनाकडे वळले होते.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत