हार्दिक पंड्याने प्रेमात नताशाला दिला धोका?  
क्रीडा

Hardik- Natasha : हार्दिक पंड्याने प्रेमात नताशाला दिला धोका? 'या' पोस्टवरून चर्चांना उधाण, महिन्याभरापूर्वी झाला होता घटस्फोट

सोशल मीडियावरील पोस्टमुळे हार्दिकने प्रेमात नताशाला धोका दिल्याचे बोलले जात आहे.

Swapnil S

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने पत्नी नताशा सोबत घटस्फोट घेतला असून आता दोघेही वेगळे झाले आहेत. नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पंड्यामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा २०२४ च्या सुरुवातीपासूनच रंगल्या होत्या. अखेर वर्ल्ड कप २०२४ नंतर हार्दिक आणि नताशा यांनी जुलै महिन्यात आपण विभक्त होत असल्याचे जाहीर केले.

हार्दिकने घटस्फोटाबाबत माहिती दिल्यावर त्याचे चाहते त्याला धीर देत होते, तर काहीजण त्यांच्या घटस्फोटाला पत्नी नताशा जबाबदार असल्याचे बोलत होते. मात्र आता सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हार्दिकने प्रेमात नताशाला धोका दिल्याचे बोलले जात आहे.

हार्दिकची पत्नी अभिनेत्री नताशा स्टेनकोविक हि सध्या त्यांचा मुलगा अगस्त्यला घेऊन सर्बियाला गेली आहे. येथे नताशा आपल्या मुलासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवत असून ती याचे फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते.

काही दिवसांपासून नताशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर काही अशा पोस्ट लाईक केल्या ज्या प्रेमातील चीटिंग आणि भावनिक छळाशी निगडित होत्या. या प्लॅटफॉर्मवर एका युझरने अनेक स्क्रीनशॉट शेअर केले ज्या पोस्ट नताशाने लाईक केल्या आहेत. युझरने हे स्क्रिनशॉट्स शेअर करत लिहिले की, "नताशाला चीटिंग आणि भावनिक छळाशी संबंधित पोस्ट लाईक केलेलं पाहणं थोडं विचित्र आहे".

एका नेटकाऱ्याने सोशल मीडियावर नताशाने लाईक केलेले स्क्रीन शॉट्स पोस्ट करून लिहिले की "चीटिंग आणि भावनिक छळाशी निगडित पोस्टला नताशाने लाईक केलं आहे. कदाचित हार्दिक पंड्याने तिला धोका दिल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला असावा". या पोस्टनंतर हार्दिक पंड्यावर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत