हार्दिक पंड्या पंजाब किंग्जकडून खेळणार; अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये, IPL मध्ये मोठी अदलाबदल! 
क्रीडा

हार्दिक पंड्या पंजाब किंग्जकडून खेळणार; अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये, IPL मध्ये मोठी अदलाबदल!

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मोठी खेळाडू अदलाबदल होणार आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पंजाब किंग्जकडून, तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात हार्दिक आणि अर्शदीप यांच्या अदलाबदलीवर सहमती झाली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मोठी खेळाडू अदलाबदल होणार आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पंजाब किंग्जकडून, तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात हार्दिक आणि अर्शदीप यांच्या अदलाबदलीवर सहमती झाली आहे. मात्र, या व्यवहाराला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) अधिकृत मान्यता मिळणे बाकी आहे.

या व्यवहारामुळे मुंबई इंडियन्ससोबतची हार्दिकची दुसरी कारकीर्द संपुष्टात येणार आहे. दुसरीकडे, अर्शदीप पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल होणार आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळण्यास हार्दिक उत्सुक असल्याची माहिती आयपीएलमधील सूत्रांनी दिली.

"हार्दिक पंजाब किंग्जकडे, तर अर्शदीप मुंबई इंडियन्सकडे जाणार आहे. हा व्यवहार पूर्ण झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळण्यास हार्दिक आनंदी आहे. अर्शदीपने पंजाब किंग्जसोबत दीर्घकाळ घालवला असून या संघाकडून खेळतानाच त्याने आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे त्याला सोडण्याचा निर्णय संघमालकांसाठी सोपा नव्हता. मात्र, कर्णधार आणि प्रशिक्षकांनी हा निर्णय घेतला," असे सूत्रांनी सांगितले.

२०२४ च्या हंगामात हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये परतला होता. त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवताना दीर्घकाळ कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माची जागा त्याने घेतली होती. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखालील तीन हंगामांपैकी दोन हंगामांत मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग; पार्थ यांनी घेतली शरद पवारांची भेट; शशिकांत शिंदे, आव्हाड यांच्या उपस्थितीत चर्चा

पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा