Photo : X (@KhelNow)
क्रीडा

हरमनप्रीतच्या हॅटट्रिकमुळे भारतीय हॉकी संघाचा विजयारंभ; आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चीनवर ४-३ अशी मात

कर्णधार हरमनप्रीत सिंगने साकारलेल्या सुरेख हॅटट्रिकच्या बळावर भारतीय पुरुष संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजयारंभ केला. त्यांनी चीनवर ४-३ अशी मात केली.

Swapnil S

राजगिर (बिहार): कर्णधार हरमनप्रीत सिंगने साकारलेल्या सुरेख हॅटट्रिकच्या बळावर भारतीय पुरुष संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजयारंभ केला. त्यांनी चीनवर ४-३ अशी मात केली.

यंदा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत भारतीय हॉकी महासंघातर्फे बिहार येथील राजगीर शहरात आशिया चषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ८ संघांचा समावेश असून भारत, चीन, जपान व कझाकस्तान अ-गटात, तर बांगलादेश, चायनीज तैपई, मलेशिया व दक्षिण कोरिया ब-गटात आहेत. हॉकीच्या आशिया चषकाचे हे १२वे पर्व असून भारत २००७ नंतर प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली असून दक्षिण कोरियाने सर्वाधिक ५ वेळा जेतेपद मिळवले आहे. क्रेग फुल्टन हे भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक आहेत. भारत या स्पर्धेत विजेतेपद मिळवेल, अशी आशा आहे. या स्पर्धेचा विजेता २०२६च्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरेल.

दरम्यान, अ-गटातील पहिल्या 13 सामन्यात भारताला चीनने विजयासाठी झुंजवले. चीनकडून दु शियाओने १२व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र जुगराज सिंगने १८व्या मिनिटाला भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर २० व्या मिनिटाला हरमनप्रीतने भारताची आघाडी २-१ अशी वाढवली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम होती.

तिसऱ्या सत्रात चेन बेन्हाई (३५) व जेनहेंग (४१) यांनी चीनकडून दोन गोल नोंदवले. तर हरमनप्रीतने ३३व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल केला.

त्यामुळे सामना ३-३ असा बरोबरीत होता. मात्र ४७व्या मिनिटाला हरमनप्रीतने निर्णायक चौथा गोल झळकावून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र या सामन्यातील विजयानंतरही प्रशिक्षक फुल्टन समाधानी नाहीत. यापुढील लढतींमध्ये भारताला कामगिरी उंचवावी लागेल, असे ते म्हणाले. हरमनप्रीतने या सामन्यात एक पेनल्टी स्ट्रोकही गमावला. तसेच मध्यांतरानंतर भारताचे खेळाडू काहीसे सुस्तावलेले दिसले. त्यामुळे ३१ तारखेला जपानविरुद्ध होणाऱ्या लढतीत भारत अधिक चांगला खेळ करेल, अशी आशा आहे.

दरम्यान, एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील लढती अन्य ठिकाणी खेळवण्यात येतील. पाकिस्तानने भारतात होणाऱ्या आशिया चषकातून माघार घेतली आहे. तसेच उभय देशांना एकमेकांच्या राष्ट्रात जाऊन खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तान अन्य देशांत आमनेसामने येतील.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती