Twitter
क्रीडा

Paris 2024 Olympics: हरमनप्रीतचा गोलधडाका कायम, भारताचा आयर्लंडवर २-० असा विजय; गटात पहिल्या क्रमांकावर झेप

कर्णधार हरमनप्रीत सिंगने सलग तिसऱ्या सामन्यात गोलधडाका कायम राखला. त्याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब-गटातील लढतीत आयर्लंडला २-० असे नेस्तनाबूत केले.

Swapnil S

पॅरिस : कर्णधार हरमनप्रीत सिंगने सलग तिसऱ्या सामन्यात गोलधडाका कायम राखला. त्याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब-गटातील लढतीत आयर्लंडला २-० असे नेस्तनाबूत केले. ३ सामन्यांतील २ विजय व एका बरोबरीच्या ७ गुणांसह भारताने गटात अग्रस्थान मिळवले आहे. आता १ ऑगस्ट रोजी भारताची टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बेल्जियमशी गाठ पडेल.

गेल्या ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून भारतीय हॉकी संघाने ४१ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला. यंदा पदकाचा रंग सोनेरी करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने भक्कम वाटचाल करताना भारताने पहिल्या लढतीत न्यूझीलंडवर ३-२ अशी मात केली. तर अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखले. आयर्लंडविरुद्ध भारताने पेनल्टी कार्नरचा अधिक लाभ उचलला.

हरमनप्रीतने १३व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर पहिला गोल केला. मग १९व्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून हरमनप्रीतने भारताचा विजय पक्का केला. तिसऱ्या व चौथ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र भारताने बचावही उत्तम केला. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशनेही आयर्लंडचे आक्रमण थोपवून धरले. हॉकीमध्ये १२ संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून प्रत्येक गटातून आघाडीचे चार संघ उपांत्यपूर्व फेरी गाठणार आहेत. त्यामुळे भारताने बेल्जियम व ऑस्ट्रेलिया यांना बरोबरीत रोखले, तरी त्यांचा पुढील मार्ग मोकळा होईल.

“दुसऱ्या सत्रात आम्ही प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नर बहाल केले. या चुका आम्हाला टाळायला हव्यात. बेल्जियम व ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्हाला अव्वल दर्जाचा खेळ करावा लागेल. या आव्हानासाठी आम्ही सज्ज आहोत,” असे भारताचा खेळाडू जर्मनप्रीत सिंग म्हणाला.

हरमनप्रीतने या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ४ गोल केले आहेत. त्याने आयर्लंडविरुद्ध २, तर न्यूझीलंड व अर्जेंटिनाविरुद्ध प्रत्येकी १ गोल नोंदवला होता.

आता सत्ताधाऱ्यांची बॅग तपासणी; टीकेनंतर निवडणूक अधिकारी सक्रिय

झारखंडमध्ये ४३ मतदारसंघांत आज पहिल्या टप्प्याचे मतदान; वायनाडमध्येही मतदानाला सुरूवात

१० वर्षांनंतर शुल्क कमी करण्याचे कारण काय? HC ने सरकारचे टोचले कान; BCCI ला पोलीस संरक्षणाचे १४.८२ कोटी केले होते माफ

मुख्यमंत्री संतापतात तेव्हा...; गद्दार म्हणणाऱ्या कार्यकर्त्याचा ठाकरे सेनेत प्रवेश

कुत्रा म्हणणाऱ्यांना मतदान करणार का? - पटोले