आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून बुधवारी रोहित शर्मा व विराट कोहली यांचे नाव गायब झाले होते. त्यामुळे अनेकांनी हे दोन्ही खेळाडू निवृत्ती पत्करत आहे का, याची चर्चा केली. मात्र आयसीसीच्या वेबसाईटवर झालेल्या तांत्रिक कारणास्तव या दोघांसह अन्य काही खेळाडूंचे नाव गायब झालेले दिसले, असे नंतर समजले. फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित सध्या दुसऱ्या, तर विराट चौथ्या स्थानी आहे. भारताचाच गिल अग्रस्थानी विराजमान आहे, तर श्रेयस सहाव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, विराट व रोहित आता फक्त एकदिवसीय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतात. १९ ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका रंगणार असून तोपर्यंत हे दोघेही खेळताना दिसणार नाहीत. गतवर्षी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर दोघांनीही टी-२०तून निवृत्ती जाहीर केली, तर यंदा मे महिन्यात दोघांनी कसोटीलाही अलविदा केला. त्यामुळे फक्त आयपीएल व एकदिवसीय प्रकारातंच दोघे खेळताना दिसतील.