क्रीडा

ICC T20 World Cup: पुन्हा एकदा फायनलला भारत-पाकिस्तान पाहायला मिळणार का? क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता...

प्रतिनिधी

आयसीसी टी-२० २०२२मध्ये (ICC T20 World Cup) भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि सेमी फायनलमध्ये आपले तिकीट निश्चित केले. तर दुसरीकडे पाकिस्तानदेखील सेमी फायनलमध्ये आश्चर्यकारकरित्या पोहचला आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींमध्ये फायनलला पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान पाहायला मिळणार का? अशी उत्सुकता लागली आहे. कारण, सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना हा न्यूझीलंडशी होणार असून भारत हा इंग्लंडशी भिडणार आहे. त्यामुळे आता आयसीसी टी-२०च्या या स्पर्धेत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

पाकिस्तान भिडणार न्यूझीलंडशी

पाकिस्तान संघ हा बाहेर पडतो ना पडतो तोच नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव केला आणि अगदी शेवटच्या दिवशी पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकीट मिळालं. यामुळे आता पहिली सेमी फायनल ही पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड अशी होणार आहे. न्यूझीलंड संघ हा ग्रुप अ मधला सगळ्यात तगडा संघ ठरला. असे असले तरीही ऐन परीक्षेत त्यांची कामगीरी कशी होते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानला देखील फायनलमध्ये प्रवेश करण्याची एक नवीन संधी मिळाली आहे.

भारत पडणार का इंग्लंडवर भारी?

आयसीसी टी २० २०२२ची दुसरी सेमी फायनल ही भारत आणि इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघ आपल्या पहिल्या चुका सुधारून इंग्लंडच्या संघाचा पराभव करतो का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा उल्लेखनीय राहिला आहे. तर गेल्या २ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर के. एल. राहुलला पुन्हा एकदा फॉर्म गवसला आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा पराजय करून भारत फायनल गाठतो का? हे येत्या १० नोव्हेंबरला कळेलच.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर

Lok Sabha Elections 2024:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान; तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात!