क्रीडा

IND vs Aus : रोहितची एकाकी झुंज; शतक झळकावताच केला 'हा' विक्रम

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात झळकावले शतक

प्रतिनिधी

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानात खेळवण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशी एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एका बाजूने झुंज देत आहे.

त्याने कर्णधार पडला साजेशी शतकी खेळी करत अनेक विक्रम केले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतला ९वे शतक साजरे केले. तसेच, तो क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी जागतिक क्रिकेटमध्ये फक्त ४ कर्णधारांना ही कामगिरी जमली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मर्फीच्या जाळ्यात अडकले दिग्गज

ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फीने भारताच्या ४ फलंदाजांना बाद करत नवा विक्रम केला. नॅथन लायनने सूर्यकुमार यादवला ८ धावांवर बाद केले. तर त्याआधी, विराट कोहली १२, चेतेश्वर पुजारा ७, रविचंद्रन अश्विन २३ आणि केएल राहुल २० धावांवर बाद झाले. तर सध्या रोहित शर्मा हा नाबाद असून त्याच्या जोडीला रवींद्र जडेजाने संयमी खेळत सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली आहे.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी