IND vs NZ : जायबंदी सुंदर मालिकेबाहेर; युवा बदोनीला प्रथमच संधी 
क्रीडा

IND vs NZ : जायबंदी सुंदर मालिकेबाहेर; युवा बदोनीला प्रथमच संधी; न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात बदल

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे २६ वर्षीय युवा खेळाडू आयुष बदोनीला भारतीय संघात प्रथमच स्थान देण्यात आले.

Swapnil S

राजकोट : अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे २६ वर्षीय युवा खेळाडू आयुष बदोनीला भारतीय संघात प्रथमच स्थान देण्यात आले.

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून उभय संघांत तीन एकदिवसीय व पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकत्रित खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे. दुखापतीतून सावरलेल्या शुभमन गिलचे या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले असून तोच कर्णधारपद भूषवत आहे. तसेच श्रेयस अय्यरही संघात परतला आहे. गिल मानेच्या तसेच पायाच्या दुखापतीमुळे एक महिना संघाबाहेर होता. तर श्रेयसला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने विश्रांती देण्यात आली आहे. एकदिवसीय प्रकाराचा विश्वचषक थेट २०२७मध्ये असल्याने भारताकडे त्याकरिता संघबांधणी करण्यासाठी तूर्तास पुरेसा वेळ आहे.

दरम्यान, रविवारी बडोदा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात केली. याच लढतीत गोलंदाजी करताना सुंदरला छातीजवळ दुखू लागल्याने मैदान सोडावे लागले. त्याने ५ षटकांत २७ धावा दिल्या होत्या. फलंदाजीस तो निर्णायक वेळी आला व नाबाद ७ धावा करून भारताला विजयीरेषा ओलांडून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये सुंदरला डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे समजले. त्यामुळे आता तो उर्वरित लढतींना मुकणार आहे. राजकोट येथे १४ला दुसरी, तर १८ तारखेला इंदूरला तिसरी लढत होईल.

बदोनीला मात्र प्रथमच भारतीय संघात बोलावण्यात आले आहे. आयपीएलमध्ये लखनऊकडून खेळणाऱ्या बदोनीने यंदा देशांतर्गत स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना छाप पाडली. त्याने २७ लिस्ट-ए सामन्यांत ३६.४७च्या सरासरीने ६९३ धावा केल्या आहेत. तसेच यंदा रणजी स्पर्धेत त्याने ५७च्या सरासरीने धावा केल्या. तो उजव्या हाताने फिरकी गोलंदाजीही करू शकतो. बदोनीला थेट संघात स्थान मिळणार का, याकडे लक्ष असेल.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; गुढीपाडव्यापासून १५ डब्यांच्या लोकल वाढणार, १६ उपनगरीय सेवांचे होणार रूपांतर

Gudi Padwa 2026 : उद्या स्वागत यात्रांचा मुंबईभर जल्लोष; गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ, खेळांची पर्वणी

इंदूरमध्ये EV चार्ज करताना शॉर्ट सर्किट; सिलिंडरचा भीषण स्फोट, ७ जणांचा दुर्दैवी अंत

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन