क्रीडा

IND vs PAK, CWC 2023 : भारतीय गोलंदाजांनी उडवली पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण ; पाकिस्तानचा डाव १९१ वर गुंडाळला

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये सुरु असलेल्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी विध्वंसक गोलंदाजीचं प्रदर्शन

नवशक्ती Web Desk

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये सुरु असलेल्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी विध्वंसक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर सुरु असलेल्या या लढतीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाचीचा निर्णय घेतला. यावेळी क्रिकेट प्रेमींना भारतीय गोलंदांच्या फेदक माऱ्याचा चित्तथरारक अनुभव आला. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १९१ धावांता पाकिस्तान संघाचा डाव गुंडाळला. आता भारतीय संघासमोर १९२ धावांचं आव्हान आहे.

सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान संघाच्या अब्दुल्ला शफिक आणि इणाम उल हक यांनी जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांचा वेगवान मारा आरामात खेळून काढला. दरम्यान, इमाम उल हक याने एका षटकात तीन चौकाराच्या मदतीने १२ धावा ठोकल्या. मात्र मोहम्मद सिराजने अब्दुल्ला शफिकला बाद करुन पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर बाबार आझम आमि इमाम उल हक यांनी मोर्चा सांभाळला. इमामने चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली. असं असताना हार्दिक पांड्याने त्याला तंबूत परत पाठवलं. यानंतर रविंद्र जडेजाने मोहम्मह रिझवानला बाद करण्याचा प्रयत्न केला मात्र तो बचावला. यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानच्या संघाटा शंभरीपार नेलं. २५ षटके होईपर्यंत पाकिस्तानच्या दोन बाद १२५ धावा झाल्या होत्या.

यानंतर मात्र पाकिस्तानच्या संघाला गळती लागली. मोहम्मद सिराजने बाबर आझमचा त्रिफळा उडवत सामन्यावर पकड मजबूत केली. यानंतर ३३ व्या षटकात कुलदीप यादवने सौद शकील आणि इफ्तिकार अहमद यांना तंबूत धाडले. तर एक बाजू भक्कम करणाऱ्या मोहम्मद सिराजचा बुमराने त्रिफळा उडवला. पाकिस्तान संघाला सावरण्याची संधी न देता३६ व्या षटकात शादाब खानची दांडी गुल करती पाकिस्तानची ७ बाद १७१ अशी अवस्था केली.

यानंतर मात्री हार्दिक पांड्याने मोहम्मद नवाजची शिकार करत पाकिस्तानला आठवा धक्का दिला. तर रविंद्र जडेजाने हसन अली आणि हॅरिस रौफ यांना बाद करत १९१ वर पाकिस्तानचा डाव गुंडाळला.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी