क्रीडा

India at Olympics, Day 6 Full Schedule: कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे आज इतिहास रचणार? बघा भारताचे १ ऑगस्टचे वेळापत्रक

Swapnil Kusale: कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसळेला गुरुवारी ऐतिहासिक पदक पटकावण्याची सुवर्णसंधी आहे.

Swapnil S

चेटेरॉक्स (फ्रान्स) : कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसळेला गुरुवारी ऐतिहासिक पदक पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. भारताच्या या प्रतिभावान खेळाडूने बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे तो आता भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घालणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या २९ वर्षीय स्वप्निलने चेटेरॉक्स राष्ट्रीय नेमबाजी केंद्रात झालेल्या या पात्रता फेरीत एकूण ५९० गुण कमावत सातवे स्थान मिळवले. पहिले आठ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. याच प्रकारात भारताचा अन्य स्पर्धक ऐश्वर्य प्रतापसिंह तोमरला मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. ऐश्वर्यला ५८९ गुणांसह ११व्या स्थानी समाधान मानावे लागले.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये तेजस्विनी सावंतच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीची धडे शिकणाऱ्या स्वप्निलने पहिल्या प्रकारात १९८, प्रोनमध्ये १९७ आणि उभे राहून नेम साधण्यात १९५ गुण मिळवले. एकूण ४४ स्पर्धेक पात्रता फेरीचा भाग होते. आता अंतिम ८ जणांत गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून पदकासाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत भारताने नेमबाजीत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत. यामध्ये मनू भाकरचा मोलाचा वाटा आहे.

धोनीचा आदर्श आणि १२ वर्षांचा संघर्ष

  • कोल्हापूरचा स्वप्निल १२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत असला तरी त्याच्या कारकीर्दीतील ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा आहे.

  • स्वप्निल मध्य रेल्वेत २०१५ पासून तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत आहे. त्याचे वडील हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून आई कम्बालवाडीची संरपच आहे. भारताचे सध्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक मनोज कुमार यांचाही स्वप्निलच्या वाटचालीत मोलाचा वाटा आहे.

  • एकेकाळी स्वप्निलसाठी रायफल विकत घेण्याकरता त्याच्या वडिलांनी कर्ज काढले होते, असे समजते. मात्र रेल्वेत नोकरी लागल्यावरही स्वप्निलने नेमबाजीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.

नेमबाजी विश्वात असंख्य महान खेळाडू आहेत. मात्र महेंद्रसिंह धोनी माझा आदर्श आहे. त्याचे शांत व संयमी व्यक्तिमत्त्व मला प्रेरणा देते. नेमबाजीसाठी तेच आवश्यक असते. मीसुद्धा तिकीट तपासनीस असल्याने त्याची आणि माझी कहाणी काहीशी सारखीच वाटते. देशासाठी पदक जिंकण्यास आतुर आहे.
- स्वप्निल कुसळे

राजेश्वरी, श्रेयसी यांच्याकडून निराशा

महिलांच्या ट्रॅप प्रकारात श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी कुमारी या भारतीयांनी दुसऱ्या दिवशीही निराशा केली. २५ शॉट्सच्या पाच फेऱ्यांअखेर राजेश्वरीला २२व्या, तर श्रेयसीला २३व्या स्थानी समाधान मानावे लागले. आघाडीचे ६ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात पृथ्वीराजलासुद्धा २१व्या स्थानी समाधान मानावे लागले.

 बघूया भारताचे आजचे वेळापत्रक

नेमबाजी

५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स

(पुरुषांची अंतिम फेरी)

स्वप्निल कुसळे

(दुपारी १ वा.)

५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स (महिलांची पात्रता फेरी)

सिफ्ट कौर सामरा, अंजूम मुदगिल

(दुपारी ३.३० वा.)

ॲथलेटिक्स

पुरुषांची २० किमी चालण्याची शर्यत

परमजीत सिंग, आकाशदीप सिंग, विकास सिंग

(सकाळी ११ वा.)

महिलांची २० किमी चालण्याची शर्यत

प्रियांका गोस्वामी

(दुपारी १२.५० वा.)

गोल्फ

पुरुषांची पहिली फेरी

गगनजीत भुल्लर, शुभांकर शर्मा

(दुपारी १२.३० वा.)

हॉकी

पुरुषांचा चौथा साखळी सामना

भारत वि. बेल्जियम

(दुपारी १.३० वा.)

बॉक्सिंग

महिला उपउपांत्यपूर्व फेरी (५० किलो)

निखत झरीन वि. वू यू

(दुपारी २.३० वा.)

तिरंदाजी

पुरुष एकेरी (राऊंड ऑफ ६४)

प्रवीण जाधव वि. काओ वेन्चाओ

(दुपारी २.३० वा.)

आगेकूच केल्यास राऊंड ऑफ ३२ फेरीतील लढत ३.३० वा.

टेबल टेनिस

महिला एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी

श्रीजा अकुला वि. सून यिंगशा

(मध्यरात्री १२.३० वा.)

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री