भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान; हॉकी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय अनिवार्य X| @TheHockeyIndia
क्रीडा

भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान; हॉकी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी विजय अनिवार्य

महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या उद्देशाने भारतीय महिला संघ रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आभासी उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरेल. गतविजेत्या आणि जगातील अव्वल क्रमांकाच्या नेदरलँड्सकडून शुक्रवारी ०-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतरही ९ व्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ अजूनही अंतिम चारच्या शर्यतीत कायम आहे.

Swapnil S

अॅम्स्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या उद्देशाने भारतीय महिला संघ रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आभासी उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरेल. गतविजेत्या आणि जगातील अव्वल क्रमांकाच्या नेदरलँड्सकडून शुक्रवारी ०-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतरही ९ व्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ अजूनही अंतिम चारच्या शर्यतीत कायम आहे.

नवीन स्वरूपानुसार भारत पुन्हा चीनचा सामना करणार नाही आणि पहिल्या फेरीतील त्यांचे गुण पुढे नेले जातील. चीनविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील बरोबरीमुळे भारताकडे १ गुण आहे. नेदरलँड्सने भारत आणि ऑस्ट्रेलियाला हरवून ६ गुण मिळवले आहेत. दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधणारा चीन २ गुणांसह पुढे आहे, तर ऑस्ट्रेलियाचेही २ गुण आहेत.

नेदरलँड्सने चीनचा पराभव केल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय भारतीय संघाला थेट उपांत्य फेरीत घेऊन जाईल. मात्र चीनने नेदरलँड्सला हरवल्यास किंवा भारत-ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत सुटल्यास तीनही संघांचे प्रत्येकी २ गुण होतील आणि गोल फरकाचा नियम लागू होईल. सध्या चीनचा गोल फरक ० आहे, तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा गोल फरक -२ आहे.

भारताची बचाव फळी या स्पर्धेत उत्कृष्ट ठरली आहे. गोलरक्षक सविता आणि बिचू देवी यांनी इंग्लंडविरुद्धच्या गोलशून्य बरोबरीत १२ पेनल्टी कॉर्नर यशस्वीरीत्या रोखले. तसेच नेदरलँड्सला मैदानी गोल करू न देता केवळ २ पेनल्टी कॉर्नरवर रोखले. कर्णधार सलिमा टेटेनेही बचावात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक शोएर्ड मारिन म्हणाले, “आम्ही सलग दोन दिवस मोठे सामने खेळलो, ज्यामुळे खेळाडूंनी शेवटी तांत्रिक चुका केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आमच्यासाठी उपांत्यपूर्व फेरीसारखाच आहे."

दीपिका, नवनीत कौरकडून अपेक्षा

आता भारताला आक्रमणात अधिक सुधारणा करावी लागेल. न्यूझीलंडमधील 'नेशन कप' विजयात ६ गोल करणारी पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट दीपिका, नवनीत कौर, सुनेलिता टोप्पो, बलजीत कौर, साक्षी, शिल्पी, लालरेमसियामी आणि नेहा यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दोन वेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलिया संघ यंदा फॉर्ममध्ये नाही. प्रो लीगमध्ये ते आठव्या स्थानावर राहिले होते. दोन्ही संघांमधील मागील ४ सामन्यांत भारताने १ जिंकला, २ गमावले आणि १ सामना बरोबरीत सुटला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

Mumbai : अभिनेता इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव; 'भारत सोडा' नोटिसला आव्हान

Mumbai : एफडीएचा निर्णय बचत गटांसाठी ‘तिखट’च; सुट्या मसाला विक्रीवर बंदी

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून पाणीकपात; पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द