पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत बुधवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. तीन पदकांपासून भारताला मुकावे लागले. कुस्तीमध्ये विनेश फोगटकडून सिल्व्हर किंवा गोल्ड मेडल मिळणार हे नक्की मानलं जात होतं. पण सकाळीच केवळ १०० ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे तिला बाद करण्यात आलं आणि भारताचं हक्काचं पदक हुकलं. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू आणि पुरुषांच्या ३००० मीटर अडथळा शर्यतीत अविनाश साबळे या मराठमोळ्या खेळाडूकडून पदकाची अपेक्षा होती. पण रात्री उशीरा झालेल्या या दोन्ही सामन्यांत मीराबाई चानू चौथ्या स्थानी तर अविनाश ११व्या स्थानी राहिल्यामुळे इथेही निराशा झाली. त्यानंतर आज गुरूवारी भारताचा ‘गोल्डन बॉय’ आणि गतविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रावर पुन्हा एकदा भारतीयांच्या नजरा असणार आहेत. नीरजने गेल्या ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करुन सुवर्णपदक मिळवावे हिच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय, हॉकीमध्ये भारताची स्पेनशी लढत असून यात विजय मिळाल्यास ब्राँझ मेडलची भर पडेल. बघूया आजचे भारताचे वेळापत्रक :
ॲथलेटिक्स
महिला १०० मीटर अडथळा शर्यत रिपिचेज फेरी
ज्योती याराजी
(दुपारी २.०५ वा.)
पुरुष भालाफेक अंतिम फेरी
नीरज चोप्रा (सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची अपेक्षा)
(रात्री ११.५५ वा.)
गोल्फ
महिलांची वैयक्तिक स्ट्रोक प्ले
दुसरी फेरी
आदिती अशोक, दीक्षा डागर
(दुपारी १२.३० वा.)
कुस्ती
पुरुष एकेरी (५७ किलो)
अमन सेहरावत वि. व्लादिमिर इगोरोव्ह (नॉर्थ मॅसेडोनिया)
(दुपारी २.३० वा.)
महिला एकेरी (५७ किलो)
अंशू मलिक वि. हेलन मरोऊलिस (अमेरिका)
(दुपारी २.३० वा.नंतर)
हॉकी
पुरुष एकेरी कांस्यपदकासाठी लढत
भारत वि. स्पेन
(दुपारी ५.३० वा.)
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, स्पोर्ट्स १८-३ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप (हिंदी आणि विविध भाषेतील समालोचनासह)