PTI
क्रीडा

दक्षिण कोरियाविरुद्ध भारताचे पारडे जड, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात उभय संघ आज भिडणार

Asian Champions Trophy Hockey Tournament: हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय पुरुष हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. सोमवारी रंगणाऱ्या उपांत्य सामन्यात भारतासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असेल.

Swapnil S

नवी दिल्ली : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय पुरुष हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. सोमवारी रंगणाऱ्या उपांत्य सामन्यात भारतासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असेल. या लढतीत भारताचेच पारडे जड मानले जात आहे.

सलग दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताने साखळीत सलग पाच विजय नोंदवले. भारताने अनुक्रमे यजमान चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांना धूळ चारून अग्रस्थान मिळवले. त्यामुळे गतविजेत्या भारतालाच यंदा पुन्हा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. विशेषत: भारताच्या आक्रमकपटूंनी साखळीत चमकदार कामगिरी केली आहे. सुखजीत सिंग, उत्तम सिंग, गुर्जोत सिंग, अरायजीत सिंग यांनी छाप पाडली आहे. तसेच गोलरक्षक क्रिशन पाठकही लक्ष वेधत आहे. विश्वातील सर्वोत्तम ड्रॅगफ्लिकर असलेल्या हरमनप्रीतने पाच पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून ऑलिम्पिकमधील कामगिरीत सातत्य राखले आहे. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत हरमनप्रीत दुसऱ्या स्थानी आहे.

मात्र दक्षिण कोरियाच्या यँग जी हूनकडून त्याला कडवी झुंज मिळू शकते. कोरियाने ५ सामन्यांतील ६ गुणांसह चौथे स्थान मिळवून आगेकूच केली. सोमवारीच होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि चीन एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.

महिलांच्या शिबिरात महाराष्ट्राच्या तिघी

महिला हॉकी संघाच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी ‘हॉकी इंडिया’ने ३३ संभाव्य खेळाडूंची निवड केली. हे शिबीर १५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत बंगळुरूतील साइ केंद्रावर पार पडेल. महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी हे शिबीर घेण्यात येत आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात भारतातच बिहारमध्ये पार पडणार आहे. या शिबिरासाठी वैष्णवी फाळके, अक्षता ढेकळे, ऋतुजा पिसाळ या महाराष्ट्राच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे.

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन-१ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी