क्रीडा

स्पेनविरुध्दच्या क्रॉसओव्हर सामन्यात भारताला विजय आवश्यक

दोन्ही सामने जिंकल्यास भारताला विजेतेपदासाठी उपांत्य आणि अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करावी लागेल.

वृत्तसंस्था

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आपले आव्हान शाबूत राखण्यासाठी भारताला रविवारी स्पेनविरुध्दच्या क्रॉसओव्हर सामन्यात विजय आवश्यक आहे. हा सामना जिंकल्यास उपांत्यपूर्वफेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुध्द लढत द्यावी लागेल.

हे दोन्ही सामने जिंकल्यास भारताला विजेतेपदासाठी उपांत्य आणि अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करावी लागेल. स्पेनविरुध्दची भारताची आकडेवारी भारतीयांसाठी दिलासादायक आहे. स्पेनविरुध्दच्या १७ पैकी सात सामने भारताने जिंकले आहेत. स्पेनने पाच सामन्यात विजय मिळविला आहे. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. या स्पर्धेत १६ संघांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागले गेले आहे. अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या उत्कंठावर्धक सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘टॉप-एट’मध्ये प्रवेशाची म्हणजेच थेट उपांत्यपूर्व फेरीची भारताची अपेक्षा पुरती मावळली होती.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा